Twitter Suspended Account धारकाची ट्विटरने माफी मागावी का? Elon Musk यांनी मागितला थेट नेटकऱ्यांचा सल्ला

निलंबित अकाउंटची ट्विटरने माफी मागावी का? असा पोल करत थेट नेटकऱ्यांनाचं एलॉन मस्कने सल्ला विचारला आहे.

Elon Musk | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ट ट्रप्म यांच्या ट्विटर वापसीनंतर एलॉन मस्क इतर सस्पेंडेंड अकाउंट पुन्हा सुरु करण्याच्या विचारात दिसत आहे. कारण एलॉन मस्कने त्या आशयाचं एक नवं ट्विट केलं आहे. तरी मस्क यांचं ते ट्विट चांगलचं चर्चेत आहे. ट्विटरच्या (Twitter) नियमांचं उल्लंघन केल्यामुळे किंवा काही आक्षेपार्ह पोस्ट शेअर (Post Share) केल्याने गेले काही दिवसांपूर्वी अनेकांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड (Twitter Account Supended) करण्यात आले. यांत सर्वसामान्यांसह अनेक दिग्दज कलाकार आणि जगप्रसिध्द राजकीय नेत्यांचा देखील समावेश होता. तर या सगळ्या सस्पेंडेंड अकाउंट बाबत एलॉन मस्क नवा विचार करताना दिसत आहे. म्हणजे हे सगळे ट्विटर अकाउंट पुन्हा एकदा ट्विटर अकाउंट ट्विटर वर कमबॅक करतील ह्याची शक्यता नाकारता येणार नाही. ट्विटरची सुत्र एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या हाती आल्यानंतर ट्विटरचा सगळा कायापालटचं झाला आहे.

 

ट्विटरचे नवे माल यांनी ट्विटरचं कामकाज, पॉलिसीज, कर्मचारी, प्रोटोकॉल (Protocal) यात 180 अंशाचा बदल केला आहे असं म्हणायला हरकत नाही. तरी आता एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या सस्पेंडेड अकाउंटबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कारण एलॉन मस्क यांनी नुकतं एक ट्विट केल आहे ज्यात त्यांनी लिहलयं, गंभीर स्पॅम किंवा कोयदा मोडलेले ट्विटर अकाउंट वगळता जे इतर कारणावरुन निलंबित ट्विटर अकाउंट आहेत, अशा निलंबित अकाउंटची ट्विटरने माफी मागावी का? असा पोल करत थेट नेटकऱ्यांनाचं एलॉन मस्कने सल्ला विचारला आहे. (हे ही वाचा:- Twitter कर्मचाऱ्यांना मोठा झटका, Elon Musk यांनी कर्मचाऱ्यांचे भत्ते केले कमी)

 

तसेच एलॉन मस्कच्या या ट्विटनंतर अत्रिनेत्री कंगणा रनौतचं देखील ट्विटर अकाउंट पुन्हा सुरु केल्या जाणार का याबाबत सोशल मिडीयावर (Social Media) चर्चा रंगल्या आहेत. तसेच बॉलिवूड (Bollywood) मधील विविध कलाकारांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. कमाल आर खान, गायक अभिजीत भट्टाचार्य, टीव्ही अभिनेत्री पायल रोहतगी, अभिनेता सुशांत सिह आणि कंगना रनौतची बहिण रंगोली हिचे देखील ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. तरी याबाबत आता ऐलॉन मस्क काय निर्णय घेणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.