iPhone 12 Effect: Apple कडून आयफोन ची नवी सीरीज लॉन्च होताच भारतामध्ये iPhone 11, iPhone XR, iPhone SE च्या किंमती घटल्या; इथे पहा नव्या किंमती
आयफोन प्रेमींना हा नवा फोन 30 ऑक्टोबरपासून खरेदीसाठी उपलब्ध असेल.
iPhone 11, iPhone SE (2020), iPhone XR New Price in India: Apple कंपनीकडून बहुप्रतिक्षीत नवी iPhone 12 series लॉन्च झाल्यानंतर काही तासांतच आता जुन्या आयफोनच्या किंमती भारतामध्ये घटल्या आहे. यामध्ये iPhone 11 आणि काही जुन्या मॉडेल्सचा समावेश आहे. भारतामध्ये iPhone 11आता 64GB storage model हॅन्डसेट सुमारे 54,900 पासुन उपलब्ध होईल. जर तुम्हांला लॉन्च झालेला नवा iPhone 12 तुम्हांला महागडा वाटत असेल आता अवघ्या 55 हजारात आयफोन 11 घेणं अनेकांसाठी चांगलं डील ठरत आहे. iPhone 11 आता नव्या किंमतींसह अॅपलच्या ऑनलाईन स्टोअरवर उपलब्ध आहे. अॅपलने आयफोन 11 सह काही अन्य मॉडेल्समध्ये ही किंमती करण्यात आल्याने तुम्ही त्याची डिल्स दएखील ऑनलाईन पाहू शकता.
Apple च्या iPhone 11, iPhone SE (2020) च्या पहा नव्या किंमती
iPhone SE (2020) 64GB storage: Rs 39,900
iPhone SE (2020) 128GB storage: Rs 44,900
iPhone SE (2020) 256GB storage: Rs 54,900
iPhone XR 64GB storage: Rs 47,900
iPhone XR 128GB storage: Rs 52,900
iPhone 11 64GB storage: Rs 54,900
iPhone 11 128GB storage: Rs 59,900
iPhone 11 256GB storage: Rs 69,900
भारतामध्ये आगामी सणासुदीचा काळ पाहता दिवाळी सेल मध्ये iPhone 11 च्या खरेदीवर AirPods मोफत दिले जात आहेत. 17 ऑक्टोबर पासून अॅपल ऑनलाईन स्टोअर वर ऑफर्स सुरू होत आहेत. सोबतच Amazon आणि Flipkart या ई कॉमर्स साईट्सदेखील iPhone 11 येत्या काळात 50 हजारांपेक्षा कमी रूपयांमध्ये उपलब्ध करून देऊ शकतात. मग जर तुम्हांला फ्री एअरपॉड्स नको असतील तर आठवड्याभरात सुरू होणार्या अमेझॉन आणि फ्लिपकार्ट्सच्या सेलसाठी तुम्ही थांबू शकता. हेदेखील वाचा- Apple कंपनीचे दिवाळी गिफ्ट ऑफर, iPhone 11 खरेदीवर फ्री मिळणार 'हे' शानदार डिवाइस
iPhone 12 लॉन्च झाला असला तरीही तो 5G सपोर्ट फोन आहे. भारतामध्ये अद्याप 5G उपलब्ध नाही. तर iPhone 11 हा 4G compatible आहे. त्यामुळे सध्या iPhone 11 वर चांगल्या डिल्स मिळवणं यामध्येच शहाणपणा आहे. भारतामध्ये नवा आयफोन वापरण्यासाठी आपल्याला थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे कारण येत्या काळात 5जी भारतामध्येही उपलब्ध होईल. अॅपलने लॉन्च केलेला नवा 5G iPhone 12 आकर्षक आणि दमदार आहे. त्यामुळे अनेकांना त्यांचा फोन अपग्रेड करण्याची इच्छा नक्कीच झाली असेल. प्रतिक्षा संपली! iPhone 12 सीरिज अखेर लाँच, किंमती प्रमाणे तितक्याच ताकदीची आहेत यांची ठळक वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर.
भारतामध्ये नवा आयफोन 12 हा सुमारे Rs 69,900 पासून उपलब्ध होईल.
iPhone 12 mini 64GB storage: Rs 69,900
iPhone 12 mini 128GB storage: Rs 74,900
iPhone 12 mini 256GB storage: Rs 84,900
iPhone 12 64GB storage: Rs 79,900
iPhone 12 128GB storage: Rs 84,900
iPhone 12 256GB storage: Rs 94,900
iPhone 12 Pro 128GB storage: Rs 1,19,900
iPhone 12 Pro 256GB storage: Rs 1,29,900
iPhone 12 Pro 512GB storage: Rs 1,49,900
iPhone 12 Pro Max 128GB storage: Rs 1,29,900
iPhone 12 Pro Max 256GB storage: Rs 1,39,900
iPhone 12 Pro Max 512GB storage: Rs 1,59,900
अॅपलकडून काल लॉन्च करण्यात आलेली iPhone 12 आणि iPhone 12 Pro ची सीरीज भारतामध्येही उपलब्ध होत आहे. आयफोन प्रेमींना हा नवा फोन 30 ऑक्टोबरपासून खरेदीसाठी उपलब्ध असेल.