IPL Auction 2025 Live

Aarogya Setu App चा नवा विक्रम; जगातील सर्वात जास्त डाऊनलोड केल्या जाणाऱ्या Top 10 अ‍ॅप्समध्ये समावेश, पहा यादी

या अ‍ॅपमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात विविध माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Aarogya Setu App (Photo Credits: Government of India)

कोरोना विषाणू संक्रमणा (Coronavirus) पासून वाचण्यासाठी भारत सरकारने आरोग्य सेतु मोबाईल अ‍ॅप (Aarogya Setu App) एप्रिलच्या सुरुवातीस लाँच केले. या अ‍ॅपमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात विविध माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कोरोना व्हायरस ट्रॅकर म्हणूनही याचा वापर केला जात आहे. अशात या अॅपने एक नवीन विक्रम केला आहे. जगभरात डाउनलोड होणाऱ्या पहिल्या 10 अॅप्समध्ये याचा समावेश झाला आहे. ही माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी देशाला संबोधित केलेल्या भाषणात लोकांना हे अ‍ॅप डाउनलोड करण्याचे आवाहन केले होते.

अमिताभ कांत यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे, ते म्हणतात. ‘आरोग्य सेतु हे अॅप लॉन्च झाल्यानंतर मे महिन्यात सलग दुसर्‍या महिन्यात ते जगभरातील टॉप 10 डाउनलोड मोबाइल अ‍ॅप्सपैकी एक बनले आहे. कोविड-19 साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी भारताने तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग करून जगासमोर एक आदर्श ठेवला आहे.’ आरोग्य सेतु हे अ‍ॅपखास  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी डिझाइन केले आहे. आरोग्य सेतू अ‍ॅपच्याद्वारे आपण कोणत्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला आहे की नाही. याबाबत माहिती मिळू शकते. याशिवाय या अ‍ॅपद्वारे कोरोना इन्फेक्शनचा किती धोका आहे हे देखील आपण शोधू शकता. (हेही वाचा: चीनच्या विरोधात Campaign केल्याने Amul कंपनीचे ट्वीटर ब्लॉक? वाचा Twitter ने काय दिले स्पष्टीकरण)

अमिताभ कांत ट्वीट -

या यादीमधील Top 10 अ‍ॅप्स -

आरोग्य सेतु अॅप हिंदी, इंग्रजी आणि मराठी यासह 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या पद्धतीही नमूद केल्या आहेत. या व्यतिरिक्त, आपल्याला कोरोना संक्रमणाचा धोका आहे की नाही, हे आपले स्थान आणि प्रवासाच्या इतिहासाच्या आधारावर हे अॅप आपल्याला सांगेल. गुगल प्ले स्टोअर वरून अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी करावी लागेल व यानंतर, भाषा निवडावी लागेल. आता आरोग्य सेतू अ‍ॅप हे 'KaiOS' प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध झाले आहे.