5G Mobile Phones: भारतात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ; आजच खरेदी करा बजेट फ्रेंडली 5G मोबाईल
5G इंटरनेट सेवा वापरायची असल्यास 5G मोबाईल फोन असणे अनिवार्य आहे. म्हणून गेले काही दिवसात 5G मोबाईल फोन खरेदी करण्याचा कल वाढला आहे. तरी आम्ही तुम्हाला काही बजेट फ्रेडली स्मार्ट फोन सुचवणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (India Mobile Congress - IMC 2022) 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. 5G इंटरनेट सेवेमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. भारतामध्ये रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल (Airtel) यासारख्या टेलिकॉम कंपन्या 5G इंटरनेट सेवा सज्ज आहेत. सुरुवातीला भारतामधील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे. यांत राज्यातील दोन प्रमुख शहर म्हणजेच मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) या दोन शहरांचा समावेश आहे. तरी भारतात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ होताचं नागरिकांमध्ये 5G इंटरनेट (Internet) सेवा बाबत मोठं कुतुहूल बघायला मिळत आहे. तरी 5G इंटरनेट सेवा वापरायची असल्यास 5G मोबाईल (Mobile) फोन असणे अनिवार्य आहे. म्हणून गेले काही दिवसात 5G मोबाईल फोन खरेदी करण्याचा कल वाढला आहे. तरी आम्ही तुम्हाला काही बजेट फ्रेडली स्मार्ट फोन (Budget Friendly Smart Phone) सुचवणार आहोत.
Samsung M13 5G:-
Samsung Galaxy M13 हा 5G मोबाईल केवळ 11,499 रुपयांच्या किमती उपलब्ध आहे. तरी तुम्ही 5G मोबाईल घेण्याच्या विचारात असल्यास Samsung M13 5G सर्वोत्तम उपाय ठरु शकतो. हा फोन ड्युअल सिम (dual Sim), 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले (HD Plus Display, रिफ्रेश रेट (Refresh Rate) 90 हर्ट्जचा, मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर 6 जीबी रॅम (GB Ram), तर 5000 एमएएचची बॅटरी (Battery) या विशेष स्पेसिफीकेशनसह (Specification) उपलब्ध आहे.
Redmi 11 Prime 5G:-
Redmi 11 Prime 5G हा मोबाईल 13,999 रुपयांना लाँच (Launch) करण्यात आला होता. रेडमीने (Redmi) नव्याने लॉंच केलेल्या फोनपैकी हा विशेष फओन आहे. Redmi 11 Prime 5G मध्ये 6.58 इंच फुलएचडी (Full HD) + डिस्प्ले (Display) आहे. स्क्रीनचा रिफ्रेश दर 90 हर्ट्झ, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास (Gorilla Glass), ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसर (Processor), 6 GB रॅम (Ram) आणि 128 GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज (Inbuilt Storage) आहे.
Realme Narzo 50 5G:-
Realme Narzo 50 5G ची किंमत आणि Redmi 11 Prime 5G ची किंमत अगदी सारखी आहे. Realme Narzo 50 5G ची किंमत देखील 13,999 रुपये आहे. Realme Narzo 50 5G मध्ये 6.58 इंच एफएचडी प्लस एमोलेड डिस्प्ले, रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज , मीडियाटेक डायमेंसिटी 810 चिपसेटचा सपोर्ट, 13 मेगापिक्सल प्रायमरी सेंसरसह (Primary Sensor) ड्यूल रियर कॅमेरा (Dual Rear Camera) आहे. Realme चा हा सर्वात परवडणारा 5G स्मार्टफोन आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)