Vivo V20 Launched in India: 44MP सेल्फी कॅमेरा असलेला विवो वी20 अखेर आज भारतात झाला लाँच, 'या' दिवशी होणार विक्रीसाठी उपलब्ध

हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G SoC सह येईल. यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आ

Vivo V20 (Photo Credits: Vivo India)

स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो (Vivo) चा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Vivo 20 आज अखेर भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे यात सेल्फी साठी 44MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची भारतीय बाजारात प्रचंड उत्सुकता होती. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमे-यासह (Selfie Camera) मुख्य कॅमे-यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप (Triple Rear Camera Set Up) मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्यूल 4G VoLTE सिम कार्डचा वापर केला आहे. या स्मार्टफोनची ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) प्री-बुकिंग सुरु झाली आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाची फुल एचडी डिस्प्ले देण्यात आली आहे ज्याचे रिजोल्युशन 1080x2400 पिक्सेल दिले आहे. हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G SoC सह येईल. यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. Vivo V20 Smartphone: विवो व्ही 20 स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार; जाणून घ्या किंमत आणि खास फिचर्स

याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 64MP चा प्रायमरी सेंसर कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8MP आणि 2MP चा चा सेंकेडरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 44MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या 6GB+128GB वेरियंटची किंमत 24,990 रुपये आहे तर 8GB+128GB स्टोरेजची किंमत 27,990 रुपये आहे. हा फोन Midnight Jazz, Moonlight Sonata, आणि Sunset Melody या रंगात उपलब्ध आहे.

यात 4000mAh ची बॅटरी देण्यात आली असून 33W ची फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. त्याचबरोबर यात USB Type C आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिले गेले आहे. हा स्मार्टफोन 20 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.