Google चा 22 Apps ना दणका, Play Store वरून हटवली, तुमच्या मोबाईलमधूनही Uninstall करा

कंपनीने म्हटले की, ही ऍप फोनची बँटरी संपवतात. तसेच, डेटा ओव्हरेजचे कारणही ठरतात.

Google removed 22 apps | (Photo courtesy: archived, edited, images)

सेक्युरीटी ऍप बणवणारी सायबर सेक्युरीटी कंपनी Sophosने लिहिलेल्या एका ब्लॉग पोस्टनंतर गूगलने आपल्या प्ले स्टोरवरून तब्बल 22 App'sची हकालपट्टी केली आहे. गुगलने ही सर्व ऍप आपल्या प्ले स्टोअरवरुन डिलिट करत हटवली आहेत. युजर्सच्या मोबाईल आणि कॉम्प्यूटर्ससाठी ही ऍप धोकादायक होती. यातील एक ऍप बॅकडोर बनवले होते. जे जाहीरातींच्या माध्यमातून युजर्सची फसवणूक करण्यासाठी मदत करत होते.गूगलने कारवाई करत ही ऍप हटविण्यापूर्वी ही २२ ऍप सुमारे 20 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आली होती. Sophos ने केलेल्या पडताळणीत ही एप्स Andr and Clickr-ad नेटवर्कशी लिंक होती. सिक्योरिटी कंपनीने म्हटले आहे की, हे एक असुरक्षित Malwareआहे. जे युजर्स आणि पूर्ण Android Ecosystem ला मोठा धोका पोहोचवते. कारण हे ऍप फेक क्लिकच्या माध्यमातून जाहिरात नेटवर्कला फायदा देते.

Sophosvs ने आपल्या ब्लॉगमध्ये विस्ताराने म्हटले आहे की, ही ऍप युजर्सच्या फोनला धोका पोहचवू शकतात. कंपनीने म्हटले की, ही ऍप फोनची बँटरी संपवतात. तसेच, डेटा ओव्हरेजचे कारणही ठरतात. कारण ही ऍप सातत्याने सुरु राहतात. तसेच बँकग्राऊंडमध्ये सर्वरने कम्यूनिकेट करत राहतात. याशिवय या ऍपमुळे डिव्हाईस पूर्णपणे C2 सर्व्हर कंट्रोलमध्ये येते. त्यामुळे सर्व्हरच्या सूचनेनुसार कोणतेही धोकादायक मॉड्यूल फोनमध्ये इन्स्टॉल केले जातात. (हेही वाचा, फोटोज whatsApp stickers मध्ये कसे कन्वर्ट कराल? या आहेत 6 सोप्या स्टेप्स !)

गूगलने हटवलेली ही App तुमच्या मोबाईलमध्ये आहेत? तुम्हीही त्वरीत हटवा

टेक्नॉलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की, गूगलच्या कारवाईनंतर युजर्सनेही ध्यानात घ्यावे की, गूगलने हटवलेली 22 ऍप्स त्यांनी आपल्या मोबाईलमधूनही काढून टाकायला हवीत. दरम्यान, Sophosच्या रिपोर्टनंतर गूगलने ही ऍप प्लेस्टोरवरुन हटवली आहेत. मात्र, लोकांनी आपल्या मोबाईलमधूनही ही ऍप्स हटवली आहेत किंवा नाही याबाबत माहिती समजू शकली नाही. दरम्यान, गूगलने अशी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याही आगोदर गूगलने अनेक ऍप प्ले स्टोर वरुन हटवली आहेत.