Commonwealth Games 2022 Schedule Day 8: राष्ट्रकुल खेळांचा आज आठवा दिवस, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

ते ऍथलेटिक्सपासून बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि लॉन बॉलच्या बाद फेरीपर्यंतच्या विविध स्पर्धांमध्ये दिसणार आहेत.

Commonwealth Games 2022 (Photo Credit: Twitter/File photo)

बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल खेळांचा (Commonwealth Games 2022) आज (5 ऑगस्ट) आठवा दिवस आहे. आज एकूण 17 सुवर्णपदके (Gold medal) पणाला लागली आहेत. भारतीय खेळाडू आज कोणत्याही सुवर्णपदक स्पर्धेचा भाग असणार नाहीत. ते ऍथलेटिक्सपासून बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि लॉन बॉलच्या बाद फेरीपर्यंतच्या विविध स्पर्धांमध्ये दिसणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतही आजपासून कुस्तीचे सामने सुरू होत आहेत. भारताचे 6 पैलवान येथे आपली ताकद दाखवतील. आज महिला हॉकीसाठीही महत्त्वाचा सामना असेल. हॉकीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हेही वाचा Cricket CWG 2022: ठरलं तर! कॉमनवेल्थ गेम्स 2022 उपांत्य फेरीत भारताचा सामना होणार 'या' मजबूत संघाशी, जाणून घ्या तारीख आणि वेळ

आजचे भारताचे पूर्ण वेळापत्रक...

लॉन बॉल्स

कुस्ती : दुपारी 3 पासून

टेबल टेनिस

ऍथलेटिक्स

बॅडमिंटन

स्क्वॅश

हॉकी

दुपारी 12.45: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (महिला उपांत्य फेरी)