IND vs IRE 2nd T20: आज भारत आणि आयर्लंड पुन्हा आमनेसामने, 'असा' असेल संभाव्य संघ
आज भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) संघ पुन्हा एकदा डब्लिन (Dublin) येथील द व्हिलेज क्रिकेट क्लब मैदानावर (The Village Cricket Club Grounds) आमनेसामने येतील.
आज भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) संघ पुन्हा एकदा डब्लिन (Dublin) येथील द व्हिलेज क्रिकेट क्लब मैदानावर (The Village Cricket Club Grounds) आमनेसामने येतील. येथील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. आजच्या सामन्यात आयर्लंड मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर भारतीय संघाची नजर त्यांचा नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्या मालिका विजयावर असेल. या सामन्यात आयर्लंडचा संघ आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह उतरणार आहे. दुसरीकडे, भारत आपल्या टीम-बीसह मैदानात उतरेल. वास्तविक, भारताचे अनेक मोठे खेळाडू सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी करत आहेत.
मात्र, असे असले तरी भारताचा संघ अतिशय मजबूत असून या संघात हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिक या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. या सामन्यात भारतीय संघ आपल्या पूर्वीच्या प्लेइंग इलेव्हनसोबतच जाऊ शकतो. म्हणजेच संजू सॅमसन आणि राहुल त्रिपाठी यांना येथे संधी मिळणे कठीण आहे. उमरान मलिकचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची खात्री आहे. हेही वाचा IND vs IRE T20: भुवनेश्वर कुमारने T20I इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रचला विक्रम
दुसरीकडे, आयर्लंडकडून कर्णधार अँड्र्यू बालबर्नी आणि पॉल स्टर्लिंग यांच्यावर बारीक नजर असेल. शेवटच्या सामन्याचा नायक हॅरी टेक्टरवरही नजर असेल. येथे खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल. मागील 6 T20 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा 180+ धावा केल्या आहेत. शेवटच्या सामन्यातही 180+ स्कोअर होऊ शकले असते पण 12-12 ओव्हरच्या मॅचमुळे स्कोअर कमी राहिला. येथे विशेष बाब म्हणजे नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी यातील काही लक्ष्य सहज साध्य केले.
या मैदानावर स्कॉटलंडनेही टी-20 मध्ये 252 धावांची मोठी धावसंख्या उभारली आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यातही धावांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या मैदानावर झालेल्या 15 पैकी 9 सामन्यांमध्ये नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 6 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला एकही विजय मिळालेला नाही. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणे पसंत करेल. हार्दिक पांड्याने मागच्या सामन्यातही असेच केले होते.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
भारत: इशान किशन, रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पंड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल.
आयर्लंड: पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), गॅरेथ डेलेनी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, अँडी मॅकब्रायन, जॉर्ज डॉकरेल, मार्क एडर, क्रेग यंग, कोनर ओल्फर्ट आणि जोश लिटल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)