Shikhar Dhawan's Fan Calls Son Zoravar 'Black': शिखर धवन याचा मुलगा झोरावरला यूजरने 'Black' म्हणून संबोधले, पत्नी आयशाने इंस्टाग्रामवर वर्णद्वेषा विरोधात केली जोरदार टीका
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन यांची पत्नी आयशा धवनने सोमवारी वंशविवादाविरूद्ध इंस्टाग्रामवर जोरदार टीका केली. सोशल मीडियावर एका यूजरने धवनचा मुलगा झोरावरला 'ब्लॅक' म्हणून संबोधल्यावरआयशा हे सर्व धीराने घेऊ शकली नाही आणि टीका यूजरला सडेतोड उत्तर दिले.
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) यांची पत्नी आयशा धवनने (Aesha Dhawan) सोमवारी वंशविवादाविरूद्ध (Racism) इंस्टाग्रामवर जोरदार टीका केली. सोशल मीडियावर एका यूजरने धवनचा मुलगा झोरावरला (Zoravar) 'ब्लॅक' म्हणून संबोधल्यावरआयशा हे सर्व धीराने घेऊ शकली नाही आणि टीका यूजरला सडेतोड उत्तर दिले. अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर मागील काही दिवसांपासून वर्णद्वेषाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अमेरिकेत फ्लॉयड, या 'ब्लॅक' नागरिकाची पोलिस कोठडीत हत्या करण्यात आली. अनेक खेळाडूंनी आणि संघटनांनी याचा निषेध केला. क्रिस गेल, डॅरेन सॅमी, ड्वेन ब्रावो यांनी क्रिकेटमध्ये भेदभाव होत असल्याचा दावा केला आणि आपली आपबिती सुनावली. फ्लॉइडच्या निधनानंतर जगभरात निदर्शने झाली आणि दिग्गज क्रिकेटपटूंसह अनेक क्रीडा व्यक्तिमत्त्व्यांनीही या विरोधात आवाज उठविला. दुसरीकडे एका चाहत्याने झोरावरवर भाष्य केले की, "जोरावर मुलगा, तू काळा आहेस आणि तू काळी राहशील." (रिषभ पंत, शिखर धवन चित्रपटाच्या पोस्टरवर झळकले तेव्हा..! पाहा Delhi Capitals संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने दिली माहिती See Tweet)
चाहत्याने केलेल्या या कमेंटनंतर आयशाने या कमेंटचा स्क्रीनशॉट तिच्या इंस्टाग्रामवरही शेअर केला आणि वर्णद्वेषाबद्दल व त्वचेच्या रंगाविषयीच्या लोकांच्या व्याभिचाराविरोधात कडक संदेश दिला. “मला चकित करते की लोक त्वचेच्या रंगाविषयी इतके काळजी करतात. जर एखादी व्यक्ती ब्राउन, काळा, पांढरा किंवा पिवळा असेल तर त्यात काय फरक पडतो? माझ्यासाठी मजेची गोष्ट अशी आहे की जगाच्या त्या भागात तार्किक आणि जैविक दृष्ट्या ब्राउन त्वचा अगदी सामान्य असते तेव्हा काही भारतीयांना त्वचेच्या रंगाचा त्रास होतो. हे म्हणजे तुम्ही स्वतःलाच नाकारण्यासारखे आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जितके आपण आपल्या वास्तविकतेचा नाकार कराल तितकेच आपण भोगत आहात. मी पूर्णपणे स्वत:च्या मालकीची आहे आणि तसंच माझा मुलगादेखील," ती पुढे म्हणाली. मात्र नंतर त्यांनी ते पोस्ट डिलीट केले.
शिखर आणि आयशाचे 2012 साली लग्न झाले तर 2014 मध्ये झोरावारचा जन्म झाला. कोरोना व्हायरसमुळे सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान दोघे आपल्या उर्वरित कुटुंबासमवेत घरी आहेत. शिखर आणि आयशा सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात आणि नियमित पोस्टसह चाहत्यांना अपडेट करतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)