पीसीबीने सरफराज अहमद यांना कर्णधार पदावरुन हटवले; अझर अली याच्याकडे कसोटी तर, बाबर आझम याच्याकडे टी-20 कर्णधारपदाची जबाबदारी
तसेच पाकिस्तान कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून अझर अली यांचे नाव समोर आले आहे. तर टी 20 संघाची जबाबदारी बाबर आझम याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
पाकिस्तान क्रिकट बोर्डाकडून सरफराज अहमद यांना कर्णधार पदावपरुन हटवण्यात आले आहे. तसेच पाकिस्तान कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून अझर अली यांचे नाव समोर आले आहे. तर टी 20 संघाची जबाबदारी बाबर आझम याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. सरफराज यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ वारंवार निराशाजनक प्रदर्शन करताना दिसला आहे. यामुळेच पाकिस्तान क्रिकेट संघाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
सरफराज यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला पराभवाच्या सामोरे जावा लागले आहे. अलिकडेच श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर 3-0 अशी मात दिली होती. एवढेच नव्हे तर, हे वर्ष पाकिस्तानच्या संघासाठी अपयशी ठरले आहे. वर्षीच्या सुरुवातीलाच पाकिस्तानच्या संघाला साऊथ अफ्रिकाकडून क्लीन स्वीप मिळाली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघाने पाकिस्तानला 5-0 असा पराभव केला होता. सरफराज यांच्या कर्णधार पदासह त्यांच्या फलंदाजीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. यावर्षी सरफराज यांच्या बॅटने कोणताही चमत्कार दाखवला नाही. हे देखील वाचा- IND vs SA 3rd Test: सलग 9 टॉस हरणाऱ्या फाफ डु प्लेसिस याने काढला तोडगा, नाणेफेकसाठी येणार आता नवीन खेळाडू
पीसीबीचे ट्वीट-
सरफराज यांनी केवळ 50 सामन्यात पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी 28 सामन्यात पाकिस्तानच्या संघाला विजय मिळवता आला आहे. दरम्यान 5अर्धशतकांच्या मदतीने 804 धावा केल्या आहेत. सरफराज यांनी 13 कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी 4 सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे.