IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान रोहित शर्माचा निखळला खांदा, स्वत: फिजिओ बनत 'असा' केला उपचार, पहा व्हिडिओ

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) गुरूवारी लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या भारत-इंग्लंड (IND vs ENG) ODI सामन्यात स्वतः फिजिओ बनला.

Rohit Sharma

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) गुरूवारी लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या भारत-इंग्लंड (IND vs ENG) ODI सामन्यात स्वतः फिजिओ बनला.  क्षेत्ररक्षणादरम्यान त्याचा खांदा निखळला तेव्हा त्याने स्वतःवर उपचार केले. त्याला स्वतःला बरे होण्यासाठी फक्त काही सेकंद लागले. इंग्लंडच्या डावाच्या 28व्या षटकात ही घटना घडली. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) गोलंदाजी करत होता आणि लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) स्ट्राईकवर होता. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लिव्हिन्स्टोनने एकेरी धाव घेत शॉट खेळला. चेंडू थेट रोहित शर्माकडे गेला, पण खांदा अचानक निखळल्याने तो पकडू शकला नाही.

यानंतर रोहितने दुसऱ्या हाताने आपला हात दुमडला आणि नंतर थोडासा धक्का देऊन खांदा स्थिर केला. जडेजाने रोहितला मेडिकल टीमला बोलावण्यास सांगितले पण रोहितने नकार दिला.  भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली, आता ती 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिला सामना गमावलेल्या इंग्लिश संघाने लॉर्ड्सवर खेळवण्यात आलेला दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका बरोबरीत आणली. हेही वाचा  Rohit Sharma On Virat Kohli: विराट कोहलीच्या प्रश्नावर वैतागला रोहित शर्मा, दिली 'ही' प्रतिक्रिया

लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. 102 धावांपर्यंत इंग्लंडने 5 विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन (33), मोईन अली (47) आणि डेव्हिड विली (41) यांच्या जोरावर संघाने दोनशे पन्नाशीच्या जवळ पोहोचले. भारताला 247 धावांचे लक्ष्य मिळाले, त्याचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 146 धावांत ऑलआऊट झाला. इंग्लिश गोलंदाज रीस टोपली हा सामनावीर ठरला. त्याने 6 विकेट घेतल्या.