'बालपणीचा हिरो गमावला'! ऋषी कपूर यांच्या निधनावर अनिल कुंबळे, वीरेंद्र सहवाग समवेत खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. कपूर यांचं 67 वर्षी मुंबईच्या एच. एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये निधन झालं. कपूरच्या निधनाच्या वृत्तानंतर क्रीडा खेळ विश्वावरही शोककळा पसरली आहे. वीरेंद्र सहवागपासून ते व्हीव्हीएस लक्ष्मण समवेत अन्य खेळाडूंनी दिवंगत अभिनेत्याला सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली.

ऋषी कपूर, वीरेंद्र सहवाग आणि अनिल कुंबळे (Photo Credit: Wikimedia, Facebook, Getty)

सलग दुसऱ्या दिवशी बॉलीवूड (Bollywood) विश्वाला धक्का बसला. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. कपूर यांचं 67 वर्षी मुंबईच्या एच. एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी यापूर्वी ऋषी कपूर यांना कर्करोगाच्या उपचारादरम्यान श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याची पुष्टी केली होती. मात्र, काही तासांपूर्वी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी I am destroyed असं म्हणत ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. ऋषी कपूरच्या निधनाच्या वृत्तानंतर क्रीडा खेळ विश्वावरही शोककळा पसरली आहे. माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सहवागपासून (Virender Sehwag) ते दिग्गज क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) समवेत अन्य खेळाडूंनी दिवंगत अभिनेत्याला सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली. (Rishi Kapoor Dies: अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन; अमिताभ बच्चन यांंनी ट्वीट करत शेअर केली दु:खद बातमी)

ऋषी कपूर यांचे फोटो पोस्ट करत लक्ष्मणने बॉलिवूड अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि आपल्या कुटुंबीयांसाठी सहानुभूती व्यक्त केली.

दुसरीकडे सेहवागने लिहिले की ऋषी कपूर यांच्या मृत्यूच्या बातमीने तो अत्यंत निराश झाला आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळेनेही आपल्या बालपणीच्या हिरोला श्रद्धांजली वाहिली.

पाहा अन्य खेळाडूंच्या प्रतिक्रिया:

आर अश्विन

संदीप शर्मा

मोहम्मद कैफ

विराट कोहली

रवि शास्त्री

शिखर धवन 

वकार युनूस

विजेंद्र सिंह 

योगेश्वर दत्त

महेश भूपती

2018 मध्ये ऋषी कपूर यांना कर्करोगाचा अघोषित प्रकार असल्याचे निदान झाले होते आणि सप्टेंबर 2019 मध्ये भारतात परत जाण्यापूर्वी जवळजवळ एक वर्ष न्यूयॉर्कमध्ये त्यांनी उपचार घेतला. ऋषी कपूर यांच्या निधनापूर्वी बॉलिवूड विश्वाने कर्करोगामुळे बहुमुखी अभिनेता इरफान खानला गमावले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif