Ramita Jindal Paris Olympic 2024 : रमिता जिंदलची 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत फायनलमध्ये मारली एन्ट्री

पीव्ही सिंधीच्या विजयाने संपूर्ण देश आनंदात असतानाचा रायफल शूटिंगमध्ये ही भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Photo Credit- X

Ramita Jindal Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024चा दुसरा दिवस आज सुरू आहे. पीव्ही सिंधीच्या विजयाने संपूर्ण देश आनंदात असतानाचा शूटिंगमध्ये ही भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एअर रायफल स्पर्धेत रमिता जिंदलने चांगली कामगिरी करत फायनल गाठले आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. रमिता जिंदलने 60 शॉट्सच्या पात्रता फेरीत एकूण 631.5 गुणांसह पाचव्या स्थान पटकावले आहे. एलाव्हेलिन वालारिवन देखील महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भाग घेत होता, परंतु यात तिच्या पदरी निराशा आली. (हेही वाचा: PV Sindhu Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूची दमदार सुरूवात; मालदीवच्या फतिमा नबाहवर विजय)

60 शॉट्सच्या पात्रता फेरीत रमिता एकूण 631.5 गुणांसह पाचव्या स्थानावर राहिली. अशी कामगरी केल्यामुळे रमिताने नवा विक्रमच जणू तिच्या नावे केला आहे. कारण, गेल्या 20 वर्षांत मनू भाकरनंतरची ती दुसरी महिला नेमबाज ठरली. तर रमिता तिच्या प्रशिक्षक सुमा शिरूरनंतर ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला रायफल नेमबाज आहे. (हेही वाचा: Paris Olympics Shooting: मनू भाकर महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र, रीदम सांगवान च्या पदरी निराशा)

पोस्ट पहा

ज्यात रमिताने पहिल्या मालिकेत 104.3, दुसऱ्यामध्ये 106.0, तिसऱ्यामध्ये 104.9, चौथ्यामध्ये 105.3, पाचव्यामध्ये 105.3 आणि सहाव्या मालिकेत 105.7 गुण मिळवले. दरम्यान स्पर्धेचा अंतिम सामना उद्या 29 जुलै रोजी होणार आहे. वालारिवन 630.7 गुणांसह 10व्या स्थानावर आहे. वलारिवनची एकवेळ अंतिम फेरी गाठण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असली तरी शेवटच्या काही शॉट्समध्ये तिला आपला वेग कायम ठेवता आला नाही.