MS Dhoni Welcomes Rafale: हवाई दलाला मिळाली राफेलची ताकद, एमएस धोनीने Golden Arrows चे अशाप्रकारे केले अभिनंदन (See Tweets)
यानंतर एमएस धोनीने सोशल मीडियाद्वारे भारतीय हवाई दलाचे अभिनंदन केले. धोनीने 17 स्क्वॉड्रॉनच्या 'गोल्डन अॅरो'ला शुभेच्छा दिल्या.
अंबाला हवाई दल स्टेशन (Ambala Air Force Station) येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, त्यांचे फ्रान्समधील समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली, संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया व संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या उपस्थितीत पाच रफाले विमानांच्या पहिल्या तुकडीला गुरुवारी भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) 17 स्क्वॉड्रॉनच्या 'गोल्डन एरोस'(Golden Arrows) मध्ये समाविष्ट करण्यात आले. भारतीय वायुसेनेचे पहिले पाच राफेल विमान (Rafale Jets) 27 जुलै, 2020 रोजी फ्रान्सहून (France) अंबाला येथे दाखल झाले होते. टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नलचा मानद पद मिळवणारे माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) सोशल मीडियाद्वारे भारतीय हवाई दलाचे अभिनंदन केले. धोनीने 17 स्क्वॉड्रॉनच्या 'गोल्डन अॅरो'ला शुभेच्छा दिल्या आणि मिराज (Mirage) 2000 च्या सर्व्हिस रेकॉर्डला हरवावे अशी आशा व्यक्त केली. SU30MKI हे त्याचे आवडते असल्याचेही धोनीने उघड केले. 2019 वर्ल्ड कप सेमीफायनलनंतर धोनीने एका महिन्याहुन अधिक कालावधीत पॅराशूट रेजिमेंटबरोबर प्रशिक्षण घेतले होते. (Rafale Induction Ceremony: राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी भारतीय वायुसेनेत औपचारिकरित्या दाखल; पहा दिमाखदार सोहळा)
“अंतिम प्रतिष्ठापना सोहळ्यासह जगातील सर्वोत्कृष्ट लढाऊ 4.5Gen लढाऊ विमानाला जगातील सर्वोत्कृष्ट लढाऊ पायलट मिळतात. आमच्या वैमानिकांच्या हाती आणि वेगवेगळ्या विमानांच्या मिश्रणाने भारतीय हवाई दलात सामर्थ्यवान बर्डची घातक शक्ती वाढेल,” धोनीने ट्विट केले. “तेजोमय 17 स्क्वॉड्रॉनला हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सर्वांसाठी राफेल मिरज 2000 च्या सर्व्हिस रेकॉर्डवर मात करेल अशी आशा आहे परंतु Su30MKI माझे आवडते राहिले आहे मुलांना डगफाइट करण्यासाठी नवीन लक्ष्य मिळते आणि सुपर सुखोईमध्ये अपग्रेड होईपर्यंत बीव्हीआरच्या गुंतवणूकीची प्रतीक्षा करतो,” धोनीने पुढे म्हटले.
दुसरे ट्विट
राफेल विमानांचा हवाई दलाच्या 17व्या स्क्वाड्रनमध्ये समारंभपूर्वक समावेश होण्यापूर्वी राफेलच्या ताफ्याला पाण्याच्या तोफांची (वॉटर कॅनन) पारंपरिक सलामी देण्यात आली. 59 हजार कोटी रुपये किमतीची 36 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी भारताने फ्रान्सशी आंतर-सरकार करार केल्यानंतर सुमारे 4 वर्षांनी पाच राफेल विमानांची पहिली तुकडी 29 जुलैला भारतात पोहोचली होती. हे फायटर विमान अनेक अंगांनी वैशिष्टयपूर्ण आहे. राफेलची शस्त्रास्त्रे खासकरुन मिसाइल सिस्टिम या विमानाला घातक बनवते.