Airthings Masters Chess Tournament: एअरथिंग्ज मास्टर्स मध्ये भारताच्या R Praggnanandhaa याच्याकडून विश्वविजेता Magnus Carlsen पराभूत

युवा भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद (R Praggnanandhaa) याने ऑनलाइन वेगवान बुद्धिबळ स्पर्धेच्या एअरथिंग्ज मास्टर्सच्या ( Airthings Masters Chess Tournament) आठव्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याला पराभूत केले आहे.

R Praggnanandhaa (Photo credit: Twitter)

युवा भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद (R Praggnanandhaa) याने ऑनलाइन वेगवान बुद्धिबळ स्पर्धेच्या एअरथिंग्ज मास्टर्सच्या ( Airthings Masters Chess Tournament) आठव्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याला पराभूत केले आहे. प्रज्ञानंद याने कलर्सन (Magnus Carlsen) याच्या विजयी घोडदौडेस लगाम लावण्यासाठी सोमवारी विविध खेळी करुन तूकड्या तुकड्यांनी विजय मिळवला. त्यासाठी त्याला 39 चाली खेळाव्या लागल्या.

तेरा वर्षीय भारतीय ग्रँडमास्टह हा आठ फेऱ्यांनंतर आठ गुणांसह 12 व्या क्रमांकावर आहे. आधिच्या फेऱ्यांमध्ये त्याचा खेळाचा वेग मध्यम राहिला. मात्र, मध्यम खेळीच्या आधारेच प्रज्ञानंद याने कलर्सन याच्यावर विजय मिळवला. भारतीय जीएम आठ गुणांसह आठ फेऱ्यांनंतर संयुक्त 12व्या स्थानावर आहे. (हेही वाचा, Online Chess Olympiad 2020: बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत, रशियाला संयुक्त जेतेपद; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खेळाडूंचे अभिनंदन)

कार्लसन हा तसा विश्वविजेता खेळाडू. त्याने रशियाच्या इयान नेपोम्नियाची, काही महिन्यांपूर्वी नॉर्वेच्या विश्वविजेतेपदाचा सामना गमावला होता. Airthings Masters, 16-खेळाडूंच्या ऑनलाइन जलद स्पर्धेत, एखाद्या खेळाडूला प्राथमिक फेरीत विजयासाठी तीन आणि अनिर्णित राहण्यासाठी एक गुण मिळतो. प्राथमिक टप्प्यात आणखी सात फेऱ्या शिल्लक आहेत.

आर प्रज्ञानंध कोण आहेत?

बुद्धिबळातील प्रतिभावान मानल्या जाणाऱ्या अभिमन्यू मिश्रा, सेर्गेई करजाकिन, गुकेश डी आणि जावोखिर सिंदारोव यांच्यानंतर येणारा आर प्रज्ञानंध हा पाचवा तरुण व्यक्ती आहे. ज्याने ग्रँडमास्टर (GM) हा बहुमान मिळवला आहे.