फोगाट कुटुंबात पुन्हा वाजणार सनई-चौघडे, बजरंग पुनिया आणि संगीता फोगाट यांचा होणार शुभमंगल सावधान

बजरंग हा 65 किलोग्रॅमवर कुश्तीमधील तो जगातील प्रथम क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याचबरोबर संगीताला देखील कोणत्या परिचयाची गरज नाहीये.

बजरंग पुनिया (Photo Credit: IANS)

गीता फोगाट-पवन कुमार, साक्षी मलिक-सत्यव्रत कदन आणि विनेश फोगाट-सोमवीर राठी यांच्या क्लबमध्ये आता बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि संगीत फोगाट (Sangeeta Phogat) यांचे नावदेखील समाविष्ट होणार आहेत. सांगण्यात येत आहे की संगीता आणि बजरंग लवकरच लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले जातील. यापूर्वी फोगाट कुटुंबातील गीता (Geeta) आणि विनेश (Vinesh) या दोघी मुली विवाह बंधनात बांधल्या गेल्या आहेत. बजरंग पुनिया हा भारतीय कुस्तीचा लोकप्रिय चेहरा आहे. 65 किलोग्रॅमवर कुश्तीमधील तो जगातील प्रथम क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याचबरोबर संगीताला देखील कोणत्या परिचयाची गरज नाहीये.

फोगाट कुटुंबातील सदस्याने आयएएनएसला सांगितल्यानुसार, बजरंग आणि संगीताच्या कुटुंबीयांमधील लग्नाविषयीची बोलणी जवळपास निश्चित झाली आहे. पण अद्याप लग्नाची तारीख निश्चित केलेली नाही. पुढील वर्षी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये बजरंग पदक जिंकेल अशी अपेक्षा केली जात आहे. त्यामुळे सध्या बजरंग ऑलिम्पिकसाठी कठोर प्रशिक्षण घेत आहे. त्याचबरोबर संगीता आजकाल तिच्या फिटनेसवरही लक्ष केंद्रित करत आहे, मागील काही दिवसाआधी एका कॅम्प दरम्यान तिला दुखापत झाली होती. अशा परिस्थितीत टोक्यो ऑलिम्पिकनंतरच लग्न करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

दरम्यान, कझाकस्तानमध्ये होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी शुक्रवारी आयजी स्टेडियमवर कुस्तीपटू पुनियाने विजय मिळवला. पुढील वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकसाठी (Tokyo Olympic) जागतिक स्पर्धा ही प्रथम पात्रता स्पर्धा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif