Mary Kom ची Women’s World Boxing Championships च्या अंतिम फेरीत धडक !
यूक्रेनच्या हना ओखोटा सोबत मेरीचा सामना होणार आहे.
Women’s World Boxing Championships स्पर्धेमध्ये भारतीय महिला बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) नॉर्थ कोरियाच्या किम ह्यंग मी वर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. किम ला मेरी कोमने ५-० ने नमवले आहे. शनिवारी मेरी कोमचा अंतिम सामना रंगणार आहे. यूक्रेनच्या हना ओखोटा सोबत मेरीचा सामना होणार आहे.
मेरी कोम(Mary Kom) अंतिम सामन्यातही विजयी ठरल्यास सहाव्या वेळेस तिला वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा मान मिळणार आहे. ४८ किलो वजनी गटातील वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन शिपमध्ये यापूर्वी मेरीने चीनची खेळाडू यु वू ला देखील ५-० ने नमवले आहे. २०१२ साली लंडनाच्या ऑलंपिक स्पर्धेमध्ये मेरी कोमने ब्रॉन्झ पदक पाटाकवले होते. सध्या सर्वाधिक गोल्ड मेडल मिळवण्याचा मान मेरी कॉम आणि आयर्न लंडाच्या केटी टेलर या खेळाडूकडे आहे.
शनिवारी मेरी कोमचा अंतिम सामना रंगणार आहे. यूक्रेनच्या हना ओखोटा सोबत मेरीचा सामना होणार आहे.