Tokyo Paralympics: अवनी लेखरा हिचा 'डबलबार; नेमबाजी क्रीडा प्रकारात दोन पदकांची कमाई

टोक्यो पॅरालिम्पिक (Tokyo Paralympics) स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा (Avani Lekhara) दुहेरी पदक विजेती ठरली आहे. 'नेमबाजी' (Shooting) या क्रीडा प्रकारात अवनी लेखरा हिने दोन पदकं जिंकली. या कामगिरीमुळे एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे.

Tokyo Paralympics | Avani Lekhara (Photo Credits-ANI)

टोक्यो पॅरालिम्पिक (Tokyo Paralympics) स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा (Avani Lekhara) दुहेरी पदक विजेती ठरली आहे. 'नेमबाजी' (Shooting) या क्रीडा प्रकारात अवनी लेखरा हिने दोन पदकं जिंकली. या कामगिरीमुळे एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. त्यामळे तिची कामगिरी ऐतिहासिक मानली जात आहे. अवनी लेखरा हिने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1 स्पर्धेत कांस्य आणि दुसऱ्या प्रकारात सूवर्ण पदक मिळवले आहे. शेवटच्या फेरीत अवनी 445.9 गुणांनी तिसऱ्या क्रमांकावर होती. याच स्पर्धेत चीनची झांग क्यूपींग आणि जर्मनीची हिलट्रॉप नताशा यांनी अनुक्रमे 457.9 आणि 457.1 गुण मिळवत अनुक्रमे सूवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. पात्रताफेरी वेळी अनी लेखरा 1176 गुणांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. अवनी लेखरा हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी कौतुक केले आहे.

दरम्यान, अवनी लेखरा हिच्या कामगिरीमुळे या स्पर्धेत भारताला 2 सूवर्ण आणि 6 रौप्य तसेच 4 कास्य पदकं मिळालीआहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताच्या इतिहासात आजवरची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी क्रीडा प्रकारात सोमवारी अवनी लेखरा हिने 249.6 गुण मिळवले. या गुणांमुळे तिला सुवर्ण पदकावर नाव कोरता आले. लेखरा हिच्या रुपात भारताला . पॅरालिम्पिक स्पर्धेत मिळालेले पहिलेच पदक आहे. (हेही वाचा, Tokyo Paralympics: प्रवीण कुमार याची 'उंच उडी', पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन)

एएनआय ट्विट

दरम्यान, पदकविजेत्या कामगिरीनंतर अवनी लेखरा हिच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी अवनी हिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये अवनी लेखरा हिचे कौतूक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनव बिंद्रा यानेही तिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Piyush Goyal on Indian Startups: 'भारतीय कंपन्यांनी किराणा सामान आणि आईस्क्रीम डिलिव्हरीपेक्षा तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करावे'; मंत्री पियुष गोयल यांनी साधला देशातील स्टार्टअप्स उद्योगावर निशाणा

Mumbai: बनावट नकाशे दाखवून केलेली बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश; बीएमसी अधिकाऱ्यांवर चौकशीचा फेरा

No Retirement At 75 Rule In BJP: 'भाजपमध्ये 75 व्या वर्षी निवृत्तीचा नियम नाही, संजय राऊत पंतप्रधान मोदींचा कार्यकाळ ठरवू शकत नाहीत'- Chandrashekhar Bawankule

PM Modi Successor: देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्या पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकाऱ्यांबद्दलच्या अटकळा; म्हणाले, '2029 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होतील'

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement