Tokyo Paralympics: प्रवीण कुमार याची 'उंच उडी', पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन
टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत (Tokyo 2020 Paralympic Games) भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. पुरुषांच्या उंच उडी (Men's High Jump) क्रीडा प्रकारात प्रवीण कुमार (Praveen Kumar) याने आज पदकविजेती कामगिरी केली. पुरुष उंच उडी टी 64 प्रकारात (High Jump T64) प्रवीणने दमदार कामगिरी करत भारताला रौप्य पदक (Silver Medal) मिळवून दिले.
टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत (Tokyo 2020 Paralympic Games) भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. पुरुषांच्या उंच उडी (Men's High Jump) क्रीडा प्रकारात प्रवीण कुमार (Praveen Kumar) याने आज पदकविजेती कामगिरी केली. पुरुष उंच उडी टी 64 प्रकारात (High Jump T64) प्रवीणने दमदार कामगिरी करत भारताला रौप्य पदक (Silver Medal) मिळवून दिले. प्रवीणच्या पदकामुळे भारताच्या खात्यावर 11वे पदक नोंदले गेले आहे. उंच उडी क्रीडा प्रकारात प्रवीण कुमार आणि इंग्लंडचा जॉनथन ब्रूम एडवर्ड्स यांच्यात सूवर्ण पदकासाठी जोरदार लढत झाली. या लढतीत प्रवीणचे सूवर्ण पदक थोडक्यात हुकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रवीण कुमार याचे अभिनंदन केले आहे.
प्रवीण कुमार याने पहिल्या प्रयत्नात 1.88 मीटर उंच उडी घेतली. ज्या उडीने त्याला पहिलं स्थान मिळवून दिले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 1.93 मीटर उडी घेतली. या उडीपासूनच प्रवीण आणि एडवर्ड्स यांच्यात काट्याची टक्कर सुरु झाली. तिसऱ्या प्रयत्नात तर त्याने 1.97 मीटर उडी मारली. त्यामुळे तो थेड पहिल्या स्थानावर आला. इथे त्याचा सामना ब्रिटनच्या एडवर्ड्सने आणि पोलंडच्या मिसीज लिपिएटोने यांच्यासोबत झाला. (हेही वाचा, PM Modi Mann ki Baat Updates : खेळांमध्ये युवकांची कामगिरी म्हणजे मेजर ध्यानचंद यांना खरी श्रद्धांजली- पंतप्रधान नरेंद्र मोदी)
ट्विट
दरम्यान पुढच्या प्रयत्नात प्रवीण आणि लिपिएटो यांनी 2.4 मीटर उडी घेतली आणि पुन्हा एकदा सामना रंगतदार टप्प्यावर आला. लगोलग इंग्लंडच्या एडवर्ड्सनेही दमदार उडी घेतली आणि चुरस वाढली. या वेळी एडवर्ड्सने मारलेल्या उडीची प्रवीणला बरोबरी करता आली नाही. परिणामी 2.07 मीटर उंच उडीसोबत प्रवीणने आशियाई विक्रम आपल्या नावावर केला. 2.10 मीटर उंच उडी मारत इंग्लंडच्या एडवर्ड्सने सूवर्ण पदक जिंकले.
पीएम मोदी ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन
प्रवीण कुमार याने रौप्य पदक जिंकताच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रवीण कुमार याचे अभिनंदन करत खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पॅरालंपीक स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रवीण कुमार याचा अभिमान वाटतो. त्याचा संघर्ष, कठोर मेहनत आणि खेळा प्रति असलेली निष्ठा या सर्वांचा हा परिणाम आहे. त्याला खूप शुभेच्छा. भविष्यातील प्रयत्नांनाही माझ्याकडून शुभेच्छा! अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)