Tokyo Olympics 2020: ऑलम्पिकच्या पूल ए मध्ये 'हे' संघ देणार भारतीय पुरुष हॉकी संघाला स्पर्धा, महिला संघाला मिळाला काठीण ड्रॉ
2016 च्या ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेल्या अर्जेंटिनासह भारतीय पुरुष संघाला पूल-एमध्ये स्थान देण्यात आले आहे. महिला विभागात राणी रामपालच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला कठीण ग्रुप मिळाला आहे. अ गटात भारताचा सामना नेदरलँड्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेशी होईल.
भारतीय हॉकी संघा (Indian Hockey Team) ने 2020 मध्ये होणार्या आगामी टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) साठी तिकिटे बुक केली आहेत. आता आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने आता या खेळांसाठी संघांसाठी ग्रुप जाहीर केले आहे. 2016 च्या ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेल्या अर्जेंटिनासह (Argentina) भारतीय पुरुष संघाला पूल-एमध्ये स्थान देण्यात आले आहे. यजमान व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, स्पेन, न्यूझीलंड देखील या ग्रुपमध्ये आहेत. दुसरीकडे, पूल बीमध्ये बेल्जियम, नेदरलँड्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. शनिवारी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) जाहीर केले.एफआयएचने हा कार्यक्रम जाहीर करत महिणतले की, "हा पूल निश्चित करण्यासाठी 2016 च्या रिओ ऑलिम्पिक प्रक्रियेचा अवलंब केला गेला होता. यात पहिल्या 16 संघांचा समावेश करण्यात आला आहेत."
दरम्यान, महिला विभागात राणी रामपाल (Rani Rampal) च्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला कठीण ग्रुप मिळाला आहे. अ गटात भारताचा सामना नेदरलँड्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेशी होईल. महिलांच्या गट 'बी' मध्ये ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, जर्मनी, न्यूझीलंड, स्पेन, चीन आणि जपानचे संघ आहेत. भारतीय पुरुष हॉकी संघाने जगातील पाचव्या क्रमांकावर असून यंदा भुवनेश्वरमध्ये झालेल्या क्वालिफायर सामन्यांमध्ये रशियाला एकूण 11-3 ने पराभूत करून ऑलिम्पिक कोटा मिळविला होता, तर राणी रामपालच्या नेतृत्वातील भारतीय महिला हॉकीने पात्रता सामन्यांमध्ये यूएसएला 6-5 ने पराभूत करून ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले. भारतीय महिला संघ सध्या नवव्या क्रमांकावर आहे.
यावेळी टोकियो ऑलिम्पिकची हॉकी सामना टोकियोच्या नव्याने तयार झालेल्या ओआय हॉकी स्टेडियममध्ये होईल. सर्व हॉकी सामने 25 जुलै ते 7 ऑगस्ट 2020 पर्यंत खेळले जातील. सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल.