Tokyo Olympics 2020: टोकियोमध्ये COVID-19 आणीबाणीची घोषणा, ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी जपान सरकारचे मोठे पाऊल

गेल्या वर्षी स्थगित करण्यात आलेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यंदा 23 जुलै आणि 8 ऑगस्टपर्यंत खेळली जाणार आहे. 7 जुलै ते 22 ऑगस्ट या कालावधीत आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली आहे.

टोकियो ऑलिम्पिक (Photo Credit: Getty Images)

Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिकच्या तयारीला मोठा धक्का देत जपान (Japan) सरकारने औपचारिकपणे गुरुवारी कोविड-19 संसर्ग (COVID-19 Infection) होण्यापूर्वी आपत्कालीन  (Emergency) स्थिती लागू केली. गेल्या वर्षी स्थगित करण्यात आलेली टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धा यंदा 23 जुलै आणि 8 ऑगस्टपर्यंत खेळली जाणार आहे. 7 जुलै ते 22 ऑगस्ट या कालावधीत आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली आहे. यामुळे खेळांतील जवळपास सर्व कार्यक्रमांमधून आयोजक चाहत्यांवर प्रवेश बंदी घालू शकतात. पंतप्रधान योशीहिडे सुगा (Yoshihide Suga) यांनी संसर्गाच्या उपाययोजनांबाबतच्या सरकारच्या बैठकीत सांगितले की, “आम्ही टोकियोमध्ये आणीबाणीची परिस्थिती लागू करू. हा कालावधी 22 ऑगस्टपर्यंत असेल.” “देशभरातील प्रकरणांमध्ये भविष्यात होणारे पुनरुत्थान रोखण्यासाठी आपत्कालीन स्थितीची आवश्यकता असल्याचे” सुगा म्हणाले. (India at Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिक स्पर्धेत ‘या’ खेळाडूंकडून भारताला पदकांची अपेक्षा, पाहा खेळातील 115 अ‍ॅथलीट्सची संपूर्ण यादी)

Kyodo ने दिलेल्या माहितीनुसार, टोकियो महानगर सरकारने 7 जुलै रोजी कोरोना व्हायरसच्या 920 प्रकरणांची नोंद केली. हा आकडा मे महिन्याच्या मध्यापासून देशातील चौथ्या लाटेच्या संक्रमणांच्या शिखरावर आहे. आणीबाणीचे मुख्य लक्ष म्हणजे बार, रेस्टॉरंट्स आणि कराओके पार्लर बंद करण्यावर आहे. ऑलिम्पिक-संबंधित उत्सवांना आवर घालण्यासाठी आणि लोकांना मद्यपान व जल्लोष करण्यापासून दूर ठेवण्यासाठी मद्यपान करण्यावरील बंदी एक महत्त्वाची पायरी आहे. टोकियोच्या रहिवाशांना घरी राहून टीव्हीवर खेळाचा आनंद लुटावा लागणार आहे. आरोग्यमंत्री नोरिहिसा तमुरा म्हणाले, “ऑलिम्पिकचा आनंद लुटत लोकांना मद्यपान करण्यासाठी बाहेर जाण्यापासून रोखणे ही मुख्य समस्या आहे.” परदेशातील चाहत्यांना महिन्यांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु दोनच आठवड्यांपूर्वी आयोजकांनी आणि आयओसीने 50% क्षमतेची जागा भरण्याची परंतु प्रेक्षक 10,000 पेक्षा जास्त नसवासी अशी परवानगी देण्याचे ठरवले होते. परंतु सरकारच्या निर्णयामुळे त्यांना पुन्हा योजना बदलण्यास भाग पाडले जाईल ज्याची घोषणा गुरुवारनंतर अपेक्षित आहे.

यंदाच्या स्पर्धेसाठी सुमारे 11,000 ऑलिम्पियन आणि 4,400 पॅरालिम्पियन जपानमध्ये दाखल होतील, तर हजारो अधिकारी, न्यायाधीश, प्रशासक, प्रायोजक, प्रसारक आणि मीडियादेखील देशात प्रवेश करण्याची परवानगी मिळाली आहे. IOC ने म्हटले की ऑलिम्पिक गावातील 80% पेक्षा जास्त रहिवाश्यांचे लसीकरण केले जाईल. दुसरीकडे, देशभरात जपानमध्ये सुमारे 810,000 प्रकरणे आणि जवळपास 14,900 लोकांनी आपला जीव लगावला आहे. केवळ 15% जपानी लोकांना संपूर्ण लसीकरण केले गेले आहे.