Team India ची नवीन Jersey T20 World Cup 2021 साठी आज होणार Launch, जाणून घ्या सर्व माहिती इथे

आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी बीसीसीआय आपल्या जर्सीचे अनावरन करेल. येत्या 17 ऑक्टोबरपासून ट्वि 20 रणधुमाळी सुरु होईल. दरम्यान, Team India ची नवीन Jersey T20 World Cup 2021 साठी आज होणार Launch लॉन्च होत आहे. त्याबाबत इथे जाणून घ्या माहिती.

Team India (Photo Credits: @BCCI/Twitter)

आयपीएल 2021 नुकतीच संपली. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा केंद्रस्थानी येणार आहे. या वेळी भारतीय क्रिकेट संघ ICC T20 World Cup 2021मध्ये आपली कामगीरी दर्शवेन. या वेळी भारतीय क्रिकेट टीम सुपर 12 ग्रुपमध्ये आहे. यात भारताशिवाय पाकिस्तान, न्युजीलँड, अफगानिस्तान आणि दोन क्वलिफायर टीम असतील. दरम्यान, आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी बीसीसीआय आपल्या जर्सीचे अनावरन करेल. येत्या 17 ऑक्टोबरपासून ट्वि 20 रणधुमाळी सुरु होईल. दरम्यान, Team India ची नवीन Jersey T20 World Cup 2021 साठी आज होणार Launch लॉन्च होत आहे. त्याबाबत इथे जाणून घ्या माहिती.

टीम इंडिया टी -20 विश्वचषकासाठी नवीन जर्सी लॉन्चींग कधी?

भारताचा अधिकृत किट प्रायोजक एमपीएलने घोषणा केली आहे की टीम इंडिया टी -20 विश्वचषकासाठी नवीन जर्सी परिधान करेल. T20 WC 2021 साठी भारताची जर्सी आज म्हणजेच13 ऑक्टोबर, 2021 (बुधवार) रोजी जाहीर होणार आहे. प्रक्षेपणाची तात्पुरती प्रारंभ वेळ रात्री 10:40 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) दिली आहे. यात बदलही होऊ शकतो. (हेही वाचा, T20 World Cup 2021: भारताचा 'या' संघाशी होणारा सामना झाला रद्द, सराव सामन्यांच्या वेळापत्रकात बदल झाल्याने चाहते निराश)

टीम इंडियाच्या नवीन जर्सी लाँचचे Live Streaming कोठे पाहाल?

टी -20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे थेट प्रक्षेपण एमपीएल करणार आहे. त्यामुळे भारताचे T20 WC 2021 जर्सी लाँचींग पाहण्यास इच्छुक असलेले चाहते MPL Sports च्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर आपली उपस्थिती दर्शवू शकतात.

आईसीसी (ICC) ने सर्व 16 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. टीम इंडिया (Team India) च्या 15 खेळाडूंचा समावेश आहे. हा संघ पाठिमागील 3 महिन्यांपूर्वीच जाहीर झाला आहे. मात्र बीसीसीआय त्यात 15 ऑक्टोबर पर्यंत बदल करु शकते. टीम इंडियाच्या टी ट्वेंटी संघाबाबत आर्दिक पंड्याच्या फिटनेसबाबत मोठे प्रस्नचिन्ह आहे. नुकतीच त्याची टीम मुंबई इंडियन्स आयपीएलबाहेर गेली आहे. त्यामुळे हार्दी पांड्या हा टी ट्वेंटीसाठी गोलंदाजी करताना तितका फिट राहील का याबाबत अनेकांना प्रश्नचिन्ह आहे. याच कारणामुळे आणखी एक अतिरिक्त वेगवान गोलंदाच संघात सहभागी केल्याचे सांगितले जात आहे. लेग स्पीनर राहुल चाहर याच्या ऐवजी युजवेंद्र चहल याचा समावेश झाल्याचीही चर्चा आहे. ​T20 World Cup 2021 चषक मिळण्याबाबत भारता आशा आहेत. तब्बल 14 वर्षनंतर पुन्हा एकदा टी20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्यासाठी क्रिकेटप्रेमी डोळे लावून बसले आहेत. या आधी टीम इंडियाने 2007 मध्ये टी20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now