Tata Mumbai Marathon यंदा 30 मे 2021 दिवशी; कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर स्पर्धा लांबणीवर

या स्पर्धेमध्ये यंदा मर्यादीत धावपटूंना प्रवेश दिला जाणार आहे.

Mumbai Marathon | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबई (Mumbai) मध्ये ऐन थंडीत रंगणारी टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) या वर्षी 30 मे 2021 दिवशी आयोजित करण्यात आली आहे. कोविड 19 संकटामुळे (COVID 19) ही मुंबई मॅरेथॉन आता पुढे ढकलण्यात आली आहे. Procam International या स्पर्धेच्या प्रमोटर्सने त्याची माहिती मंगळवार, 9 फेब्रुवारी दिवशी दिली आहे.

दरम्यान प्रोकॅमने दिलेल्या माहितीनुसार, सावधगिरीने पावलं टाकत सर्वांशी चर्चा करून मोठ्या आशेने यंदाची मुंबई मॅरेथॉन स्पर्धा पुढे ढकलल्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय घेताना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिटिक्स महासंघ तसेच राज्य सरकार व अन्य प्रशासकीय विभागांसोबत बोलून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई मॅरेथॉन मध्ये पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, 10 किलोमीटर शर्यत अशा 3 विविध गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये यंदा मर्यादीत धावपटूंना प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेतही कोविडच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. TMM 2021 App च्या माध्यमातून भारत आणि जगभरातून धावपटू ते जेथे आहेत तेथून देखील मॅरेथॉनमध्ये धावू शकतील अशी सोय करण्यात आली आहे. नक्की वाचा: मुंबई मॅरेथॉनला गालबोट! 64 वर्षीय वृद्ध गजानन माळजलकर यांचा कार्डियाक अरेस्ट मुळे मृत्यू.

 

टाटा मुंबई मॅरेथॉनची बदललेली वेळ ही धावपटूंना आता 3 महिने आधीच सांगण्यात आल्याने त्यांना तयारीसाठी, ट्रेनिंग रेजिमसाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. दरम्यान या स्पर्धेचा पुढील तपशील लवकरच कळवला जाणार आहे. आतापर्यंत टाटा मुंबई मॅरेथॉनचं आयोजन जानेवारी महिन्यात होत असे.