Sara Lee Passes Away: माजी WWE 'टफ इनफ' विजेती सारा ली हिचे निधन, वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी अखेरचा श्वास

ती 30 वर्षांची होती. सारा ली (Sara Lee Passes Away) ही WWE या जगप्रसिद्ध कार्यक्रमाची “टफ इनफ” (Tough Enough) रिअॅलिटी स्पर्धेतील विजेती होती. साराची आई टेरी ली यांनी आपल्या मुलीच्या निधनाची बातमी फेसबुक पोस्टद्वारे गुरुवारी दिली.

Sara Lee | (Photo Credits: Facebook)

सारा ली (Sara Lee) हिचे निधन झाले आहे. ती 30 वर्षांची होती. सारा ली (Sara Lee Passes Away) ही WWE या जगप्रसिद्ध कार्यक्रमाची “टफ इनफ” (Tough Enough) रिअॅलिटी स्पर्धेतील विजेती होती. साराची आई टेरी ली यांनी आपल्या मुलीच्या निधनाची बातमी फेसबुक पोस्टद्वारे गुरुवारी दिली. साराच्या जाण्याने तिच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच, वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी मृत्यू झाल्याने क्रीडा वर्तुळातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

साराची आई टेरी ली यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही अतिशय जड अत:करणाने हे सांगतो आहोत की, आमची कन्या सारा वेस्टन येशूकडे गेली आहे. तिच्या जाण्याने आम्हाला प्रचंड धक्का बसला आहे. इहलोकातील तिचा प्रवास संपण्याच्या कार्याची तयारी अद्याप सुरु झाली नाही. कृपया आप्तेष्टांनी भेटीसाठी गर्दी करु नये. आम्हाला तिच्या जाण्याचे दु:ख पचवू द्या. आम्हा सर्वांसाठी आणि खास करुन तिच्या मुलांसाठी प्रार्थना आणि आशिर्वादांची गरज आहे. (हेही वाचा, WWE स्टार John Cena याने शेअर केले Arshad Warsi याचे फोटो; सोशल मीडियावर युजर्सकडून भन्नाट प्रतिक्रिया)

सारा ली हिने 2015 मध्ये WWE च्या "टफ इनफ" चा सहावा सीझन तिचे चाहते आणि प्रेक्षकांमुळे जिंकला. त्यासाठी तिला तब्बल $250,000 नी करारबद्द करणयात आले होते. ही स्पर्धा जिंकण्यासाठी तिला व्यावासायिक कुस्ती प्रशिक्षण घ्यावे लागले होते. दरम्यान टफ इनचा सहावा सीझन जिंकल्यावर तिने लगेच पुढच्या वर्षी म्हणजेच 2016 मध्ये फ्रँचायजी सोडली.

ट्विट

साराचे आयुष्य फारच गतीमान होते, तिने WWE ची "टफ इनफ'' फ्रँचायजी सोडल्यावर (2016) लगेच पुढच्या वर्षी म्हणजेच 2017 मध्ये माजी WWE कुस्तीपटू कोरी वेस्टन (रिंग नाव वेस्ली ब्लेक आणि वेस्टिन ब्लेक) याच्याशी लग्न केले. या दाम्पत्यास 5 वर्षांची एक मुलगी आणि 3 वर्षांचा एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif