Video: बॉक्सिंग रिंगमध्ये ठोसा वर्मी; अपराजीत बॉक्सर Maksim Dadashev चा मृत्यू

रिंगमध्ये सामना खेळत असताना प्रतिस्पर्थ्याचा ठोसा त्याल वर्मी लागला. जखमी अवस्थेत असलेल्या Maksim Dadashev याला रुग्णालयात तत्काळ दाखल करण्या आले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला.

Maksim Dadashev | (Photo Credits: Instagram)

Maxim Dadashev Dead: खेळाच्या मैदानावर कधी कधी अशा काही घटना घडतात की, ज्या केवळ नियती आणि अपघात म्हणूनच त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. मग तो क्रिकेटच्या मैदानावर असेला फिल ह्यूज याचा मृत्यू असो की, एखाद्या कलाकाराचा व्यासपीठावर झालेला मृत्यू असो. रशियाचा 28 वर्षीय बॉक्सर मॅक्सीम दादाशेव (Maksim Dadashev) याचाही मृत्यू असाच धक्कादायक आणि तितकाच करुन झाला. रिंगमध्ये सामना खेळत असताना प्रतिस्पर्थ्याचा ठोसा त्याल वर्मी लागला. जखमी अवस्थेत असलेल्या Maksim Dadashev याला रुग्णालयात तत्काळ दाखल करण्या आले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला. शेवटच्या सामन्याआधीचे 13 सामने अजिंक्य राहिलेल्या Maksim Dadashev आसा मृत्यूसोबत झालेल्या आयुष्याच्या लढाईत मात्र पराभव स्वीकारावा लागला.

आयबीएफ ज्यूनिअर वेल्टरवेट टायटलच्या एलिमिनेटर बाऊटमध्ये सुब्रिल मटियास याच्यासोबत फाईट करताना मॅक्सीम दादाशेव जखमी झाला. सुब्रिल मटियास याच्याकडून लगावण्यात आलेला ठोसा Maksim Dadashev याच्या डोक्याला वर्मी लागला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहात होते. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र, शस्त्रक्रियेनंतरही त्याची प्रकृती सुधारली नाही. त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर एका दिवसानंतर त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूची अधिकृत घोषणा करताना शनिवारी सांगितले की, प्रतिस्पर्ध्याकडून बसलेला ठोसा वर्मी लागल्याने Maksim Dadashev याच्या मेंदूला धक्का बसला होता. हा धक्काच त्याच्या मृत्यूला कारणीभूत झाला. (हेही वाचा, पंचिंग बॅग सोबत सराव करताना Boxer ज्योती प्रधान हिचा वयाच्या 20 वर्षी मृत्यू)

मटियास आणि मॅक्सीम दादाशेव यांच्यात तुंबळ सामना सुरु होता. दोघांमधील फाईट एका उंचीवर पोहोचली होती. दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये होते. मात्र, 11 व्या राऊंडवेळी दादाशेव याच्या फाईट ट्रेनरने फाईट थांबवली. त्यांनी पाहिले की, मॅक्सीम दादाशेव (Maksim Dadashev) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्त वाहात आहे. ट्रेनर मॅकग्रिथ यांनी सांगितले की, त्यांनी जेव्हा ही फाईट थांबवली तेव्हा Maksim Dadashev याने ट्रेनरच्या निर्णयाला नकार देण्यासाठी आपले डोके जोरात हालवले. पण, जर मी ही फाईट थांबवली नसती तर, रेफ्रींनी ही फाईट नक्कीच थांबव असती, असे मॅकग्रिथ यांनी म्हटले आहे.

ट्विट

दरम्यान, फाईट थांबवल्यानंतर Maksim Dadashev रिंगमध्येच उलटीही करायला लागला. 'मॅड मॅक्स' नावाने प्रसिद्ध असलेला Maksim Dadashev हा रिंगमधून ड्रेसिंग रुमपर्यंत जाण्याच्या अवस्थेतही नव्हता. त्यामुळे त्याला रिंगमधून थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला प्रचंड सूज आली होती. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. मात्र, मृत्यूसोबतची त्याची झूंज अपयशी ठरली. मृत्यूपूर्वीचे 13 सामने अजिंक्य राहिलेला Maksim Dadashev आयुष्याच्या लढाईत मात्र पराभूत झाला. त्याचा करुन मृत्यू झाला.