रॉजर फेडरर याने 5 वर्षात चौथ्यांदा फ्रेंच ओपनमधून घेतली माघार, सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट, पाहा

वर्षाच्या दुसर्‍या ग्रँड स्लॅममधून त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 38 वर्षीय टेनिसपटूला गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. याबाबत त्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे.

रोजर फेडरर (Photo Credit: AP/PTI)

स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर (Roger Federer) यावर्षी गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे फ्रेंच ओपनला (French Open) मुकणार आहे. वर्षाच्या दुसर्‍या ग्रँड स्लॅममधून त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 38 वर्षीय टेनिसपटूला गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. याबाबत त्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे. फेडररने गुडघ्याच्या प्रदीर्घ समस्येवर मात करण्यासाठी शस्त्रक्रिया केली आहे. 20 ग्रँड स्लॅम विजेत्याने सोशल मीडियाद्वारे सांगितले की, बुधवारी त्याच्यावर स्वित्झर्लंडमध्ये शस्त्रक्रिया झाली आहे आणि 24 मे ते 2 जून दरम्यान होणाऱ्या फ्रेंच ओपनसह अनेक स्पर्धांमध्ये तो खेळू शकणार नाही. या दुखापतीनंतर तो यापुढे इंडियन वेल्स (Indian Wells) आणि फ्रेंच ओपनमध्ये खेळणार नाही. मागील वर्षी फ्रेंच ओपनच्या सेमीफायनल फेरीत फेडरर सरळ सेटमध्ये राफेल नदाल (Rafael Nadal) कडून पराभूत झाला. फेडररने यापूर्वी 2017 आणि 2018 मध्ये संपूर्ण क्लेकोर्ट सीझनमधून माघार घेतली होती आणि गेल्या वर्षी फ्रेंच ओपनसाठी पॅरिसमध्ये येण्यापूर्वी केवळ दोन स्पर्धा खेळल्या होत्या.

स्विसच्या दिग्गज टेनिसपटूने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "माझा उजव्या गुडघामुळे माझ्या चिंता काही काळ वाढल्या होत्या. मला आशा आहे की हे बारा होईल, परंतु माझ्या काही तपासणी आणिटीमशी संवादानंतर मी बुधवारी स्वित्झर्लंडमध्ये ऑर्थोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला." वर्षाच्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धा, ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत नोवाक जोकोविचकडून पराभूत झाल्यावर फेडरर स्पर्धेतून बाहेर पडला. फेडरर दुबई ओपनमध्ये सहभाग घेणार होता, पण त्याने नंतर माघार घेतली.

तो पुढे म्हणाला, 'या प्रक्रियेनंतर डॉक्टरांनी सांगितले की ही (ऑपरेशन) करणे योग्य होते आणि त्यांना (डॉक्टरांना) पूर्ण विश्वास आहे की ही पूर्णपणे दुरुस्त होईल. यामुळे मी दुबई, इंडियन वेल्स, बोगोटा, मियामी आणि फ्रेंच ओपनमध्ये भाग घेऊ शकणार नाही. सर्वांच्या सहकार्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी पुन्हा खेळायला उत्सुक आहे, लवकरच मैदानावर भेटू."



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif