Rafael Nadal याची मोठी घोषणा, स्पॅनिश दिग्गज टेनिसपटूने 2021 हंगामावर लावला ब्रेक
शुक्रवारी स्पॅनिश दिग्गजाने 2021 हंगामाच्या समाप्तीची घोषणा केली. नदालने नुकतंच सिनसिनाटी ओपन आणि यापूर्वी विम्बल्डन व ऑलिम्पिक खेळातून दुखापतीमुळे माघारी घेतली होती.
टेनिस दिग्गज आणि 20 वेळा ग्रँड स्लॅम विजेता राफेल नदालने (Rafael Nadal) पायाच्या दुखापतीमुळे यंदा वर्षीच्या उर्वरित हंगामावर ब्रेक लावला आहे. नदालच्या या घोषणेचा अर्थ असा की तो यंदा महिनाअखेरीस सुरु होणाऱ्या US Open ग्रँड स्लॅम स्पर्धेत देखील खेळणार नाही.