PKL 2024 Full Squad List: प्रो कबड्डी लीग संघ आणि खेळाडूंची नावे; पाहा संपूर्ण यादी

प्रो कबड्डी लीग 2024 ची सुरुवात 18 ऑक्टोबर रोजी तेलुगू टायटन्स आणि बेंगळुरू बुल्स यांच्यातील रोमांचक सामन्याने होईल. सर्व 12 संघांची संपूर्ण संघाची यादी आणि विक्रमी लिलावातील ठळक वैशिष्ट्ये येथे जाणून घ्या.

PKL | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

प्रो कबड्डी लीग 2024 (Pro Kabaddi League 2024) आता प्रत्यक्ष मैदानावर खेळ दाखविण्यास सज्ज झाली आहे. एकूण 12 संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा, येत्या 18 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना तुलुगू टाटटन्स आणि बंगुळुरु बुल्स Telugu Titans Vs Bengaluru Bulls) यांच्यात खेळला जाईल. महत्त्वाचे म्हणजे प्रो कबड्डी संघांची यादी (Pro Kabaddi League 2024 Full Squad List) त्यांच्या खेळाडूंच्या नावासह जाहीर झाली आहे. त्यामुळे आपणही आपल्या आवडता संघ त्यातील शिलेदार यांसह त्यांचे खास वैशिष्ट्य जाणून घेऊ शकता. त्यासाठी खाली दिलेल्या यादीवर आपण नजर टाकू शकता.

तेलुगु टायटन्स आणि बेंगळुरू बुल्स यांच्यात पहिली लढत

आयपीएल आणि तत्सम पाश्चात्य खेळांच्या वर्चस्वाला धक्का देत, मातीशी इमान राखत परंपरेने खेळला जाणारा खेळ म्हणजेच कबड्डी. खेळाकडे बघण्याचा बदलता दृष्टीकोण, क्रीडारसिक आणि चाहत्यांसह, डिजिटल युगात प्रेक्षकांची बदललेली आवडनिवड यामुळे खेळांच्या धाटणीतही बदल झाला आणि उदयास आली प्रो कबड्डी लीग. जी दरवर्षी आपला नवा हंगाम घेऊन क्रीडाप्रेमींच्या भेटीला दाखल होत असते. यंदा या स्पर्धेचे 11वे वर्ष आहे. स्पर्धेची सुरुवात शुक्रवार, 18 ऑक्टोबर रोजी, गचीबोवली इनडोअर स्टेडियमवर तेलुगु टायटन्स आणि बेंगळुरू बुल्स यांच्यातील सामन्याने होईल. (हेही वाचा, Pro Kabaddi League 2024 Full Schedule: प्रो कबड्डी लीग संपूर्ण वेळापत्रक,ठिकाण आणि तपशील; येत्या 18 ऑक्टोबरपासून हंगाम सुरू)

प्रो कबड्डी लीग संघांतील खेळाडूंची संख्या

आपल्या शिलेदारांसह मैदानात उतरणाऱ्या संघांसाठी कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 25 खेळांडूंची संख्या निर्धारित करण्यात आली होती. जी पीकेएल 2024 लिलावानंतर (PKL Auction) पूर्ण करण्यात आली. हा लिलाव 15 आणि 16 ऑगस्ट रोजी पार पडला. ज्यामध्ये पटना पायरेट्सचा माजी कर्णधार असलेला सचीन तन्वर याने सर्वात मागडा भारतीय खेळाडू म्हणून पुन्हा एकदा मजल मारली. तर तामिळ थलावयास संघाकडून त्याच्यासाठी 2.15 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. दरम्यान, मोहम्मदरेझा शादलैई हा सर्वात मगाडा विदेशी खेळाडू ठरला आहे. मुळचा इराणचा असलेला शादलैई हा हरियाणा स्टीलर्स संघाकडून खेळणार असून त्यासाठी संघमालकाने तब्बल 2.07 कोटी रुपये मोजले आहेत. (हेही वाचा, Pro Kabaddi League: प्रो कबड्डी लीग, बंगळुरु बुल्स संघातील अव्वल खेळाडू)

प्रो कबड्डी लीग 2024 साठी सर्व 12 संघांची यादी

बंगाल वॉरियर्सः विश्वास एस, नितीन कुमार, श्रेयस उंबरदंड, आदित्य एस. शिंदे, दीपक अर्जुन शिंदे, महारुद्र गर्जे, फझल अत्राचली, मनिंदर सिंग, चाय-मिंग चांग, नितेश कुमार, मयूर जगन्नाथ कदम, प्रवीण ठाकूर, संभाजी वाबळे, हेम राज, आकाश बी. चव्हाण, अर्जुन राठी, वैभव भाऊसाहेब गर्जे, सागर कुमार, प्रणय विनय राणे, सुशील काम्बरेकर, यश मलिक, मंजीत, दीप कुमार.

बंगळुरू बुल्सः पोनपर्थीबन सुब्रमण्यम, सुशील, रोहित कुमार, सौरभ नंदल, आदित्य पोवार, अक्षित, अरुलनंदा बाबू, पार्टीक, अजिंक्य पवार, परदीप नरवाल, लकी कुमार, मंजीत, चंद्रनायक एम, हसन थोंगक्रुए, प्रमोद सैसिंग, नितीन रावल, जय भगवान, जतीन.

दबंग दिल्लीः आशु मलिक, विक्रांत, नवीन कुमार, आशिष, हिम्मत अंतिल, मनू, योगेश, आशिष, सिद्धार्थ देसाई, मोहित, संदीप, मोहम्मद. मिझानूर रहमान, मोहम्मद बाबा अली, नितीन पंवार, बृजेंद्र सिंग चौधरी, गौरव छिल्लर, हिमांशू, राहुल, परवीन, रिंकू नरवाल, विनय.

गुजरात जायंट्सः बालाजी डी, जितेंद्र यादव, परतीक दहिया, राकेश, नितीन, गुमन सिंग, सोमबीर, मोहम्मद इस्माइल नबीबख्श, वाहिद रेझा एमेहर, नीरज कुमार, मोनू, राज डी सालुंखे, हिमांशू, हिमांशु सिंग, आदेश सिवाच, हर्ष महेश लाड, रोहन सिंग, मोहित, मनुज, नितेश.

हरियाणा स्टीलर्सः राहुल सेठपाल, घनश्याम मगर, जयदीप, मोहित, विनय, जया सूर्या एन. एस., हरदीप, शिवम अनिल पातारे, विशाल एस. टेट, मोहम्मदरेझा शादलोई चियानेह, ज्ञान अभिषेक, मणिकंदन एस., साहिल, विकास जाधव, संजय, मणिकंदन एस., आशिष गिल, नवीन, संस्कार मिश्रा.

जयपूर पिंक पँथर्सः अर्जुन देशवाल, रेझा मीरबघेरी, अंकुश, अभिषेक के. एस., अभिजीत मलिक, सुरजीत सिंग, ऋतिक शर्मा, रोनक सिंग, सोमबीर, नितीन कुमार, अमीर हुसेन मोहम्मदमलेकी, अर्पित सरोहा, श्रीकांत जाधव, विकास कंडोला, नीरज नरवाल, मयांक मलिक, आमिर वानी, रवी कुमार, लकी शर्मा, के. धरणीधरन, नवनीत.

पाटणा पायरेट्सः अंकित, संदीप कुमार, मनीष, अबिनंद सुभाष, कुणाल मेहता, सुधाकर एम, शुभम शिंदे, अयान, साहिल पाटील, दीपक, नवदीप, हमीद मिर्झई नादेर, जंग कुन ली, गुरदीप, त्यागराजन युवराज, दीपक राजेंद्र सिंग, प्रशांत कुमार राठी, मीतू शर्मा, देवांक, सागर, अमन, प्रविंदर, बाबू मुरुगसन.

पुणेरी पलटणः अबनेश नादराजन, गौरव खत्री, आदित्य शिंदे, आकाश शिंदे, मोहित गोयत, अस्लम इनामदार, पंकज मोहिते, संकेत सावंत, दादासो पुजारी, नितीन, तुषार अधवाडे, वैभव कांबळे, मोहित, आमिर हसन नोरोझी, अली हादी, अमन, अजित व्ही. कुमार, मोहम्मद. अमान, आर्यवर्धन नवले, विशाल, सौरव.

तामिळ थलायवाजः नरेंदर, साहिल, मोहित, आशिष, सागर, हिमांशू, एम. अभिषेक, नितेश कुमार, नितीन सिंग, रोनक, विशाल चहल, सचिन तंवर, अनुज गावडे, धीरज बेलमारे, रामकुमार मायंडी, मोईन सफागी, अमीरहोसेन बास्तमी, सौरभ फागरे.

तेलुगू टायटन्सः शंकर गडई, अजित पवार, अंकित, ओंकार पाटील, प्रफुल्ल झवारे, संजीव एस, पवन सहरावत, कृष्ण ढुल, विजय मलिक, रोहित, सागर, चेतन साहू, नितीन, मिलाद जब्बरी, मोहम्मद मलक, सुंदर, मंजीत, आशिष नरवाल, अमित कुमार.

यू मुंबाः अमिरमोहम्मद जफरदानेश, रिंकू, शिवम, बिट्टू, गोकुलकन्नन एम, मुकिलन षण्मुगम, सोमबीर, सुनील कुमार, मंजीत, सनी, दीपक कुंडू, लोकेश गोसलिया, अजित चौहान, अमीन घोरबानी, परवेश भैंस्वाल, शुभम कुमार, एम धनसेकर, स्टुअर्ट सिंग, विशाल चौधरी, आशिष कुमार, सतीश कन्नन.

यूपी योद्धाः सुमित, सुरेंद्र गिल, आशु सिंग, गगन गौडा एचआर, हितेश, शिवम चौधरी, भरत हुड्डा, साहुल कुमार, जायेश महाजन, गंगाराम, सचिन, केशव कुमार, मोहम्मदरेझा कबौदरहंगी, हैदराली एकरामी, महेंद्र सिंग, भवानी राजपूत, विवेक, अक्षय आर. सूर्यवंशी.

दरम्यान, सर्व संघ हंगामासाठी सज्ज होत असताना, कबड्डी चाहते प्रो कबड्डी लीग 2024 च्या संपूर्ण हंगामात थरार, उत्सुकाता आणि अनिश्चितता या सर्वांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत. फक्त प्रतिक्षा आहे ती, येत्या 18 ऑक्टोबर या दिवसाची. या दिवसापासून सुरु होईल एक उत्कंटावर्धक थरार.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now