Paris Olympics 2024 Closing Ceremony Live Streaming: पॅरिस ऑलिम्पिकची आज होणार सांगता, जाणून घ्या कधी अन् कुठे विनामूल्य Live पाहणार सोहळा
समारोप समारंभात भारताकडून ध्वजवाहक कोण असेल याचीही माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
Paris Olympics 2024 Closing Ceremony: पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा आज (Paris Olympics 2024) शेवटचा दिवस आहे. पॅरिस ऑलिम्पिकची आज रात्री सांगता होणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. यामध्ये 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. ही पदके भारतीय हॉकी संघ मनू भाकर (Manu Bhaker), सरबज्योत सिंग (Sarabjot Singh), स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale), नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि अमन सेहरावत (Aman Sehrawat) यांनी जिंकली आहेत. यादरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा समारोप सोहळा तुम्ही कधी, कसा आणि कुठे पाहू शकता हे आम्ही तुम्हाला सांगू. समारोप समारंभात भारताकडून ध्वजवाहक कोण असेल याचीही माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. (हे देखील वाचा: Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची मोहिम 6 पदकांवर संपली; 1 रजत, 6 कांस्य पदकांची कमाई)
समारोप समारंभ कधी सुरू होईल?
पॅरिस ऑलिम्पिक-2024 चा समारोप समारंभ आज रात्री 12:30 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल. या सोहळ्याचे भारतात थेट प्रक्षेपण होणार आहे. भारतीय चाहत्यांना स्पोर्ट्स-18 वाहिनीवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत हा सोहळा पाहता येणार आहे.
हा सोहळा तुम्ही मोबाईलवर पाहू शकता
पॅरिस ऑलिम्पिक-2024 चा समारोप सोहळा भारतातही मोबाईलवर पाहता येईल. दुपारी 12.30 वाजल्यापासून या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जिया सिनेमा ॲपवर होणार आहे. या मोबाईल ॲपवर क्रीडा चाहत्यांना हा कार्यक्रम विनामूल्य पाहता येणार आहे.
समारोप समारंभात भारताकडून ध्वजवाहक कोण असेल
पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या समारोप समारंभात भारताचे प्रतिनिधित्व महिला गटात मनू भाकर करणार आहे आणि पीआर श्रीजेश पुरुष गटात प्रतिनिधित्व करेल. मनू भाकरने या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी प्रकारात 2 कांस्यपदके जिंकली आहेत. तर भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने आपल्या दमदार कामगिरीने संघाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या समारोप समारंभात हे दोन खेळाडू भारतासाठी ध्वजवाहक असतील.