ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणे हेच माझे लक्ष्य- मेरी कोम

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणे हे माझे एकमेव ध्येय असल्याचे मेरी कोमने पीटीआयशी बोलताना सांगितले.

मेरी कोम (Photo Credit: Getty Images)

जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत (World Boxing Championship) सहाव्यांदा विश्वविजेत्या पदाला गवसणी घालणाऱ्या मेरी कोमचे (Mary Kom) लक्ष्य आता ऑलिम्पिक (Olympics) सुवर्णपदकाकडे (Gold Medal) लागले आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणे हे माझे एकमेव ध्येय असल्याचे मेरी कोमने पीटीआयशी बोलताना सांगितले. 2020 मध्ये टोकीयोत ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे.

लंडनमध्ये 2012 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी कोमने कांस्यपदकावर आपले नाव कोरले होते. आता मात्र सुवर्णपदक हे माझे लक्ष्य आहे. 6 व्यांदा विश्वविजेत्या पद पटकवल्यामुळे मी आनंदी आहे. यामुळे मला पुढील स्पर्धांसाठी नक्कीच आत्मविश्वास मिळाला आहे. भारतासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणे हे माझे ध्येय असून त्या दृष्टीने मी सरावही सुरु केला असल्याचे मेरी कोमने सांगितले.

सरावाशिवाय यश मिळणे कठीण आहे. त्यामुळे अजूनही मी सरावाच्या बाबतीत अतिशय काटेकोर आहे. दिवसातून दोन-तीन सरावाचे सेशन्स असले तरीही मी त्यापैकी एकही मीस करत नाही. मी माझे कोच, SAI (Sports Authority of India) यांच्याशी मी बोलले आहे. आम्हांला चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत आणि त्यामुळे यंदा चांगल्या परिणामांची अपेक्षा असल्याचेही मेरी कोम म्हणाली.