Sushil Kumar Bail: कुस्तीपटू सुशीलकुमारला जामीन मंजूर, सागर धनकर हत्याप्रकरणातून तिहार जेलमधून सुटका

पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय आणि मानवतावादी आधारावर आधारीत दिल्ली न्यायालयाकडून कुस्तीपटू सुशीलकुमारला नऊ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सुशील कुमार | (Photo Credits: Instagram)

ऑलिंपियन सुशील कुमार (Sushil Kumar) याची अंतरिम जामिनावर तिहार तुरुंगातून (Tihar Jail) सुटका करण्यात आली आहे. ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन सागर धनकरच्या (Sagar Dhankar) हत्येप्रकरणी सुशील कुमार तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत होता. तरी दिल्ली न्यायालयाकडून देवू केलेल्या जामीनावर सुशीलकुमारची सुटका झाली आहे. सुशील कुमारची पत्नी सावी कुमार हिची प्रकृती गंभीर असुन तिच्यावर शस्त्रक्रीया केल्या जाणार आहे. तरी पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय आणि मानवतावादी आधारावर आधारीत दिल्ली न्यायालयाकडून (Delhi Court) कुस्तीपटू सुशीलकुमारला नऊ  दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर (Jail) करण्यात आला आहे. तरी जामीनाच्या या नऊ दिवसांनंतर कोर्ट पुढील सुनावणी करत सुशीलकुमारला आदेश देतील.काल संध्याकाळीच सुशीलकुमारच्या सुटकेचे वॉरंट तिहार तुरुंगात (Tihar Jail) पोहोचला.

 

सुशील कुमारची (Sushil Kumar) तिहार तुरुंगाच्या गेट क्रमांक ४ ऐवजी वेगळ्या गेटमधून सुटका करण्यात आली. 4 जे सामान्यत: सुरक्षेच्या कारणास्तव कैद्यांना सोडण्यासाठी वापरले जाते पण सुशीलकुमारला मात्र वेगळ्या गेटमधून सोडण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव सुशीलकुमारला वेगळ्या गेटमधून सोडण्यात आले असल्याची माहिती सुशील कुमारच्या वकिलांनी दिली आहे. तरी सागर धनकर हत्याकांडात एकूण 18 आरोपी अटकेत असुन त्यापैकी एक सुशील कुमार आहे. (हे ही वाचा:- IND vs PAK Final T20 World Cup: भारत-पाकिस्तान होणार फायनल? हे दोन सामने संपूर्ण ठरवतील समीकरण)

 

दिल्ली न्यायालयाने (Delhi Court) शुक्रवारी कुस्तीपटू सुशील कुमारला पाठीच्या खालच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी अंतरिम जामीन मंजूर केला. 7 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. पाळत ठेवण्यासाठी आणि त्याच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायाधीशांनी नऊ दिवसांनंतर सुशीलकुमारला 13 नोव्हेंबरला संबंधित कारागृह अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif