Paris Olympics 2024: मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी नाकारली सरकारी नोकरीची ऑफर

ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणाऱ्या मनू भाकरला क्रीडा मंत्रालयाने 30 लाख रूपयांचे बक्षीस दिले आहे. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची आज भेट घेतली.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये (Paris Olympics 2024) भारताला नेमबाजीच्या स्पर्धेत तीन पदके मिळाली. सरबज्योत सिंग आणि मनू भाकर (Manu Bhaker) यांनी भारताला कांस्य पदक मिळवून दिले. या दोघांनाही हरियाणा सरकारने नोकरीची ऑफर दिली आहे. मात्र आहे. सरबज्योत सिंग आणि मनू भाकरने नोकरीची ऑफर न स्वीकारण्याचे कारणही ऐकुन सर्वांनी त्यांचे कौतृक केले आहे. (हेही वाचा - Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची मोहिम 6 पदकांवर संपली; 1 रजत, 6 कांस्य पदकांची कमाई)

पाहा पोस्ट -

ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणाऱ्या मनू भाकरला क्रीडा मंत्रालयाने 30 लाख रूपयांचे बक्षीस दिले आहे. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची आज भेट घेतली. त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल व प्रोत्साहनाबद्दल खूप आभार. त्यांच्या अविरत प्रयत्नांनी देशाचे खेळाडू आणखी उंच शिखरावर पोहोचतील अशी मला खात्री आहे, असे मनू भाकरने सोशल मीडियावर ट्विट करत म्हटलं आहे.

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे मीडिया समन्वयक मुकेश वशिष्ठ यांनी या भेटीनंतर एक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी सरकारी नोकरी करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. दोघांचं म्हणणं आहे की ते नोकरीसाठी नव्हे, तर सुवर्ण पदकांसाठी खेळत आहे. दरम्यान, मनू भाकर आणि सबरज्योत सिंग यांना क्रीडा विभागात उपसंचालकपदाची ऑफर देण्यात आली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement