Maharashtra Kesari Kusti 2019-20: पुणे येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरु; पाहा आजचा अंतिम निकाल

त्यामुळे याही वेळी यो दोन मल्लांकडे स्पर्धेच्या नजरा आहेत. त्यामुळे याही वेळी बाला रफीक शेख आणि अभिजित कटके हा सामना मोठा रंजक ठरणार आहे. त्यामुळे यो दोन मल्लात कोण कोणावर भारी पडणार याबाबात उत्सुकता आहे.

Kusti | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

Maharashtra Kesari Wrestling Tournament First Day Result: राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari Kusti) स्पर्धा आज (शुक्रवार, 3 जानेवारी 2019) पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल (Shree Shiv Chhatrapati Krida Sankul, Balewadi) बालेवाडी येथे दिमाखदार सोहळ्यात सुरु झाली. स्पर्धेचे यंदा 63 वे वर्ष आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मल्ल या स्पर्धेसाठी पुण्यात दाखल झाले आहेत. महाराष्ट्राच्या मातीतला खेळ अशी कुस्तीची देशभरात ओळख आहे. आमदार महेश लांडगे यांनी या स्पर्धेच उद्घाटन केले. या वेळी कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, अमानोराचे अनिरुद्ध देशपांडे आणि क्रीडा युवा संचालनालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, स्पर्धेची सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 57 आणि 79 किलो वजनी गटाच्या माती विभागातील अंतिम फेरीचे सामनेही आजच पार पडले.

गतवेळी या स्पर्धेत बाला रफीक शेख हा मल्ल विजेता तर, अभिजित कटके हा मल्ल उपविजेता ठरला होता. त्यामुळे याही वेळी यो दोन मल्लांकडे स्पर्धेच्या नजरा आहेत. त्यामुळे याही वेळी बाला रफीक शेख आणि अभिजित कटके हा सामना मोठा रंजक ठरणार आहे. त्यामुळे यो दोन मल्लात कोण कोणावर भारी पडणार याबाबात उत्सुकता आहे.

आजच्या लढती  57 आणि 79 किलो वजनी गट (माती विभाग)

57 आणि 79 किलो वजनी गट:

57 किलो वजनी गट (माती विभाग)

79 किलो वजनी गट (गादी विभाग)

रामचंद्र कांबळे (सोलापूर) आणि निलेश पवार (कोल्हापूर) या दोन्ही मल्लांमध्ये झालेल्या लढतीत निलेश पवार याने 13-4 अशी आघाडी घेत अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीसाठी रवींद्र खरे (उस्मानाबाद) आणि श्रीधर मुळे (सातारा) यांच्यात लढत झाली. त्यात रवींद्र खरे याने 4-1 अशा फरकाने बाजी मारली आणि अंति फेरी गाठली. आता उद्या म्हणजेच 4 जानेवारी 2020 (शनिवार) च्या सकाळच्या सत्रात रवींद्र खरे आणि रामचंद्र कांबळे असा गादीवरचा सामना रंगणार आहे. (हेही वाचा, Maharashtra Kesari Kusti 2019-20: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा Tickets मोफत! सामने पाहण्यासाठी जाणून घ्या शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी पुणे येथे कसे पोहचाल)

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पहिला दिवस (3 जानेवारी 2020) अंतिम निकाल (माती विभाग)

79 किलो वजनी गट
मल्लाचे नाव गाव (जिल्हा) पदक
हणमंत पुरी उस्मानाबाद रौप्य
धर्मा शिंदे नाशिक कांस्य
57 किलो वजनी गट
संतोष हिरुगडे कोल्हापूर शहर रौप्य
ओंकार लाड नाशिक कांस्य

दरम्यान, या स्पर्धेत प्रत्येक वजनी गटात पदक विजेता ठरणाऱ्या मल्लास रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. त्यानुसार सुवर्णपदक विजेता 20,000 रुपये, रौप्यपदक विजेता 10,000 रुपये तर कांस्यपदक विजेता मल्ल 5,000 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी असणार आहे.