Maharashtra Kesari Kusti 2018: महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान गोंधळ, काका पवार तालमीचा स्पर्धेवर बहिष्कार

Maharashtra Kesari Kusti Spardha 2018 आयोजकांच्या पक्षपाती धोरणामुळे काका पवार यांच्या तालिमीतील मल्लानी मैदान सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Kesari Kusti 2018 Jalna (photo Credits: Youtube Still)

Maharashtra Kesari Kusti Spardha 2018 : महाराष्ट्रामध्ये मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अंतिम टप्पात आली आहे. यंदा महाराष्ट्र केसरीची (Maharashtra Kesari )  गदा कोण जिंकणार याची उत्सुकता असताना गतविजेत्या काका पवार तालीमने (Kaka Pawar Talim)  स्पर्धेवर बहिष्कार टाकला आहे. आयोजकांच्या पक्षपाती धोरणामुळे काका पवार यांच्या तालिमीतील मल्लानी मैदान सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजच्या स्पर्धेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहे. पुढील सामना 4 वाजता सुरु होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कशामुळे राडा ?

यंदा महाराष्ट्र केसरी २०१८ स्पर्धा जालन्यात सुरु आहे. आज अभिजित काटके विरुद्ध गणेश जगताप या खेळाडूंदरम्यान सामना सुरु होता. मात्र कुस्ती दरम्यान पंचानी वेळेआधी शिट्टी वाजवल्याचा दावा काका पवारांच्या तालमीने केला आहे. आयोजक आणि काका पवार यांच्या तालमीतील मल्लांचा वाद वाढत गेला. सुरुवातीला त्यांनी मैदानातच ठिय्या मांडला होता. आयोजकांपैकी आत्माराम भगत आणि दयानंद भगत यांनी काका पवार तालिमीच्या मल्लावर हात उगारल्याचाही आरोप केला आहे. जाणीवपूर्वक काका तालिमच्या मल्लाला खाली खेचण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचं काका पवार तालीमच मत आहे.

पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचं आवाहन

जालन्यात पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद आटोक्यात आला आहे. महाराष्ट्र केसरी २०१८ चं आयोजन जालन्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केलं आहे. स्पर्धेचं उत्तम आयोजन केलं असताना कोणी जाणीवपूर्वक स्पर्धेला बोट लावणं हा प्रकार चुकीचा असल्याच म्हटलं आहे. तसेच अशा प्रकारामध्ये पोलीस कारवाई होईल असा इशाराही  अर्जुन खोतकर यांनी दिला आहे. अन्याय झाला असेल तर रीतसर दाद मागा असं आवाहन त्यांनी केलं आहे.