Khabib Nurmagomedov ने शेअर केला प्रेरणादायी थ्रोबॅक व्हिडिओ, तरुणांना आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी नक्कीच करेल प्रवृत्त
हा व्हिडिओ तरुणांना आयुष्यातील त्यांचे ध्येय गाठण्यासाठी त्यांच्या मर्यादेपेक्षा स्वत:ला ढकलण्यासाठी प्रेरित करेल. खबीबने 24 ऑक्टोबर 2020 रोजी अबू धाबी येथे यूएफसी 254 मुख्य कार्यक्रमात निवृत्तीची घोषणा केली.
Khabib Nurmagomedov ने 24 ऑक्टोबर 2020 रोजी अबू धाबी येथे यूएफसी 254 मुख्य कार्यक्रमात निवृत्तीची घोषणा केली. खबीबच्या निवृत्तीची बातमी यूएफसी विश्वासाठी खरोखरच धक्कादायक ठरली कारण खबीब लाइटवेट विभागातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. अलीकडेच, खबीबने 2015 मध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केल्या नंतरचा प्रेरक थ्रोबॅक प्रशिक्षण व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ तरुणांना आयुष्यातील त्यांचे ध्येय गाठण्यासाठी त्यांच्या मर्यादेपेक्षा स्वत:ला ढकलण्यासाठी प्रेरित करेल. खालील लेखात, आपण सोशल मीडियावर 'द ईगल'ने शेअर केलेला हा आश्चर्यकारक प्रशिक्षण व्हिडिओ पाहणार आहोत ज्यात तो म्हणतो की केवळ भूक लोकांना प्रेरित करते. खबीबने आपला शेवटचा सामना जस्टिन गेथजेविरुद्ध युएफसी 254 मुख्य कार्यक्रमात खेळला जिथे त्याने आपल्या निर्विवाद लाइटवेट चँपियनशिपचा यशस्वीपणे बचाव केला. (Khabib Nurmagomedov ने पुनरागमन करत कॉनोर मॅकग्रेगोरचा पुन्हा एकदा सामना करावा, अमेरिकेचे माजी UFC चॅम्पियन डेनिअल कोरमिअर यांनी व्यक्त केली इच्छा)
UFC मधील आपल्या अंतिम फाईटनंतर खबीबने सांगितले की, आपले वडिल बाजूला नसताना त्याला लढायचे नाही. खविबचे प्रशिक्षक आणि वडील अब्दुलमानप यांचे वयाच्या 57व्या वर्षी जुलै महिन्यात कोविड संसर्गामुळे होणाऱ्या गुंतागुंतीमुळे निधन झाले. "माझ्या वडिलांशिवाय मी परत येणार असा कोणताही मार्ग नाही. जेव्हा यूएफसीने मला जस्टिन (गेथजे) बद्दल फोन केला, तेव्हा मी तीन दिवस माझ्या आईशी बोललो. वडिलांविना मी कसे फाईट करावे हे तिला माहित नाही, परंतु मी वचन दिले की ही माझी शेवटची फाईट असेल आणि मी माझा शब्द दिला तर मला त्याचे अनुसरण करावे लागेल,” विजयानंतर खबीबने पत्रकारांना सांगितले. खबीबचा थ्रोबॅक ट्रेनिंग व्हिडिओ पाहा...
खबीबने अपराजित 29-0 अशा रेकॉर्डसह आपली कारकीर्द संपुष्टात आणली. खबीबने गेथजेला दुसर्या फेरीत 1 मिनिट 24 सेकंदात त्रिकोणी लॉक सबमिशनद्वारे पराभूत केले. दरम्यान, खबीबच्या अनुपस्थितीचा निश्चितच यूएफसी दर्शकांवर परिणाम होईल, कारण 'द ईगल' अनेक क्लासिक सामने खेळला आहे. यूएफसी 229 मधील Conor McGregor विरुद्ध एक फाईट नेहमीच लक्षात राहील कारण त्याने विक्रमी दर्शकांना आकर्षित केले.