Khabib Nurmagomedov Images & HD Wallpapers: UFC मधून नुकतंच निवृत्त झालेल्या रशियन एमएमए स्टारला Motivational Quotes, Facebook Greetings व SMS द्वारे द्या शुभेच्छा
दरम्यान, आपण खाबीब नूरमगोमेदोवचे चाहते असल्यास, आपण 'द ईगल'ला ट्रिब्यूट देण्यासाठी हे एचडी फोटो, वॉलपेपर, कोट्स आणि शुभेच्छा डाउनलोड करू शकता.
Khabib Nurmagomedov Images & HD Wallpapers: खाबीब नूरमगोमेदोव (Khabib Nurmagomedov) खरोखरच लाईटवेट विभागातील सर्वात चांगला यूएफसी कुस्तीपटू आहे. 24 ऑक्टोबर 2020 रोजी अबू धाबी (Abu Dhabi) येथे झालेल्या यूएफसी 254 मुख्य कार्यक्रमात जस्टिन गेथजे (Justin Gaethje) याला पराभूत करून निवृत्तीची घोषणा करून रशियन एमएमएच्या (MMA) फायटरने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. नूरमगोमेदोवने आपल्या निर्विवाद लाईटवेट चँपियनशिप पट्ट्यात यशस्वीरित्या गेथजेविरुद्ध बचाव केला. ईगलने 29-0 च्या विजयी रेकॉर्डसह आपली कारकीर्द संपविली, जिथे तो एप्रिल 2018 पासून 24 ऑक्टोबर 2020 रोजी निवृत्तीपर्यंत यूएफसी लाइटवेट चॅम्पियन (UFC Lightweight Champion) होता. खाबीबने गेथजेविरुद्ध लढाईनंतर निवृत्तीची घोषणा केल्यापासून, रशियन एमएमए स्टारला शुभेच्छा देण्यासाठी इंटरनेटवर खाबीब नूरमगोमेदोव एचडी फोटो, वॉलपेपर, प्रेरणादायी कोट्स, शुभेच्छा, फेसबुक ग्रीटिंग्ज सर्च होत आहेत. (Khabib Nurmagomedov Retires: यूएफसी चॅम्पियन खाबीब ‘द ईगल’ नूरमगोमेदोव बद्दल 'या' 7 माहित नसलेल्या गोष्टी ऐकून व्हाल चकित)
इंस्टाग्रामवर खाबीबचे 23 लाखहूनही जास्त फॉलोअर्स आहेत, ज्यामुळे तो सर्वाधिक फॉलो केला जाणारा रशियन सेलिब्रिटी बनला आहे. 6 ऑक्टोबर 2018 रोजी यूएससी 229 येथे कॉनोर मॅकग्रेगोर विरूद्ध लस वेगास येथे झालेल्या लढ्याबद्दल खाबीब जास्त आठवला जाईल. या लढ्यात, नूरमगोमेदोवने सबमिशनद्वारे चौथ्या फेरीत मॅकग्रेगरचा पराभव केला होता. दरम्यान, आपण खाबीब नूरमगोमेदोवचे चाहते असल्यास, आपण 'द ईगल'ला ट्रिब्यूट देण्यासाठी हे एचडी फोटो, वॉलपेपर, कोट्स आणि शुभेच्छा डाउनलोड करू शकता.
खाबीब नूरमगोमेदोवव्हॉट्सअॅप फोटो
खाबीब नूरमगोमेदोव फोटोज
खाबीब नूरमगोमेदोव एचडी मोबाईल फोटो
खाबीब नूरमगोमेदोव डेस्कटॉप वॉलपेपर
खाबीब नूरमगोमेदोव एचडी फेसबुक फोटो
खाबीब नूरमगोमेदोव एचडी वॉलपेपर
खाबीब 2011 च्या उत्तरार्धापासून यूएफसीशी संबंधित होता. यूएफसी विजेतेपद मिळविणारा नूरमगोमेदोव पहिला मुस्लिम झाला. 2 ऑक्टोबर, 2020 पर्यंत, फाईट मॅट्रिक्सने बी.जे. पेनच्या मागे त्याला दुसरे सर्वाधिक लाइटवेट घोषित केले. त्याच्या निवृत्तीने खरोखरच यूएफसी चाहते दुखी झाले असतील. पण आम्ही खाबीब नूरमगोमेदोवला त्याच्या आगामी प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो.