Avinash Sabale: भारतीय जवानाने अमेरिकेत रचला इतिहास, 30 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला
अविनाश सध्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीच्या निमित्ताने अमेरिकेत आहे. साबळे हे भारतीय लष्कराचे शिपाई असून ते बीड, येथील आहेत.
महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने (Avinash Sabale) 5000 मीटरमध्ये बहादूर प्रसादचा 30 वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. महाराष्ट्रातील 27 वर्षीय अविनाशने अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो (San Juan Capistrano, USA) येथे साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये 13:25.65 च्या वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम केला. साबळेने या शर्यतीत 12वे स्थान पटकावले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये 1500 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा नॉर्वेचा जेकब इंजेब्रिग्टसेन हा विजेता ठरला. त्याने 13:02.03 सेकंदात शर्यत पूर्ण केली. बहादूर प्रसाद यांनी 1992 मध्ये बर्मिंगहॅम येथे 13:29.70 सेकंदांच्या वेळेसह राष्ट्रीय विक्रम केला, जो 30 वर्षे अबाधित राहिला. अविनाश सध्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीच्या निमित्ताने अमेरिकेत आहे. साबळे हे भारतीय लष्कराचे शिपाई असून ते बीड, येथील आहेत.
Tweet
टोकियो ऑलिम्पिकमध्येही राष्ट्रीय विक्रम झाला
अविनाशच्या नावावर तीन हजार मीटर स्टीपलचेसचा राष्ट्रीय विक्रमही आहे. त्याने स्वतःचा 3000 मीटर स्टीपलचेसचा राष्ट्रीय विक्रम अनेकदा मोडला आहे. मार्चमध्ये तिरुअनंतपुरम येथे झालेल्या इंडियन ग्रांप्री -2 दरम्यान त्याने 8:16.21 सेकंदांच्या वेळेसह सातव्यांदा असे केले. त्याने गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 8:18.12 सेकंदाच्या वेळेसह राष्ट्रीय विक्रमही केला होता. युजीन, यूएसए येथे 15 ते 24 जुलै दरम्यान होणार्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो यापूर्वीच पात्र ठरला आहे.