Indian Snooker Championship 2025: Pankaj Advani याची चमकदार कामगिरी; भारतीय स्नूकर अजिंक्यपद 2025 स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक
पंकज अडवाणी याने त्याच्या कामगिरीत सातत्य आणि अचूकता राखत भारतीय स्नूकर अजिंक्यपद 2025 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. एका फ्रेमने मागे पडल्यानंतरही, त्याने आपला संयम राखला आणि टेबलवर नियंत्रण ठेवले. 84 ब्रेक मारत त्याने अजिंक्यपद जिंकले.
Indian Snooker Championship 2025: भारताचा सर्वात यशस्वी स्नूकर खेळाडू पंकज अडवाणीने (Pankaj Advani) यशवंत क्लबमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 36 वे राष्ट्रीय विजेतेपद (Indian Snooker Championship) आणि 10 वे पुरुष स्नूकर विजेता मान पटकावला. अडवाणीने त्याच्या सुरुवातीच्या पराभवावर मात करून अंतिम फेरीत ब्रिजेश दमानी याला हरवले. दमानी हा एकमेव स्नूकर होता. जो संपूर्ण सामन्यात एक फ्रेम जिंकू शकला. ही स्पर्धा आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी एकमेव निवड स्पर्धा म्हणून काम करते. पंकज अडवाणीने आयबीएसएफ वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये विक्रमी 28 वे जागतिक विजेतेपद जिंकले. तर, सौरव कोठारीने कांस्यपदक जिंकले. (Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खणखणीत 41 वं शतक; हरियाणा-मुंबई रणजी ट्रॉफी 2024-25 सामन्यात केली कामगिरी)
संपूर्ण भारतीय स्नूकर अजिंक्यपद 2025 स्पर्धेत अडवाणीच्या कामगिरीत सातत्य आणि अचूकता दिसून आली. सुरूवातील एका फ्रेमने मागे पडल्यानंतर, अडवाणीने आपला संयम राखला आणि टेबलवर नियंत्रण ठेवत पुन्हा चुकांसाठी फारशी जागा सोडली नाही. शेवटच्या फ्रेममध्ये, अडवाणीने प्रभावी 84 ब्रेक दिले आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
त्याच्या विजयावर प्रतिक्रीया देताना पंकज अडवाणीने म्हटले की,"आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी देशाचे प्रतिनिधी ठरवणारी ही एकमेव स्पर्धा असल्याने, त्यामुळे मोठी कठीण स्पर्धा होती." गट टप्प्यातील सामन्यांमध्ये अडवाणीला दमानी यांच्याकडून स्पर्धेतील एकमेव पराभवाला सामोरे जावे लागले. ज्यात तो फक्त एक फ्रेम जिंकू शकला. अंतिम सामन्यात कोणतीही चूक न करता अडवाणी विजयी झाला, त्याने सामन्यात फक्त एक फ्रेम गमावली.
राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या 91 व्या आवृत्तीत 48 च्या फेरीत 4-2 ने पिछाडीमुळे तो जवळजवळ स्पर्धेतून बाहेर पडला होता. "48 च्या फेरीच्या सामन्यात जेव्हा मी जवळजवळ स्पर्धेतून बाहेर पडलो होतो. तेव्हासुद्धा सुवर्णपदकाबद्दल एक आशा मनात होतीच. तेव्हा मला कळले की याचा अर्थ काहीतरी मोठे वाट पाहत आहे. बिलियर्ड्स आणि स्नूकर दोन्हीमध्ये पुन्हा भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद झाला," अडवाणी म्हणाले.
15 फेब्रुवारीपासून आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप सुरू होणार असल्याने, अडवाणी आणि दमानी दोघांनाही आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी खेळण्याची संधी आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)