Premier League: मुकेश अंबानींची आता क्रिकेट पाठोपाठ फुटबॉलमध्ये ही एण्ट्री! अंबानी होणार फुलबॉल टीम लिव्हरपूल एफसीचे नवे मालक
भारतात क्रिकेटचे करोडो फॅन्स आहेत. पण फुटबॉलचे तर संपूर्ण जगात अब्जो फॅन्स आहेत आणि तेच आता अंबानींनी हेरल आहे. त्यातही टीम लिव्हरपूल एफसी म्हण्टलं की विषय संपला. तरी मुकेश अंबानी हे टीम लिव्हरपूलचे नवे मालक होणार अशी चर्चा रंगली आहे.
हल्ली मुकेश अंबानी (Mukesh Ambani) बस नाम ही काही है असंच काहीस चित्र आहे. टेलिकॉम इंन्डस्ट्री (Telecom industry), आयपीएल टीम (IPL Team), लॉजिस्टीक (logistic), सोलर पॅनल (Solar Pannel) इंन्डस्ट्री, इनफ्रास्टक्टर (Infrastructure), मिडीया इंन्डस्ट्री (Media Industry) अशा विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये खोलवर पाय रोवला असताना आता अंबानींची पुढचा गोल म्हणजे फुटबॉल असचं काहीसं चित्र आहे. कारण इंडिय प्रिमीयर लिंग (Indian Premier League) मधील मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) मालक मुकेश अंबानींची (Mukesh Ambani) पुढची नजर आहे ती फुटबॉलवर. आयपीएलमध्ये मोठ्या इनव्हेस्टमेंटनंतर (Investment) मुकेश अंबानींना चिक्कार नफा मिळतो. कारण भारतात क्रिकेटचे करोडो फॅन्स आहेत. पण फुटबॉलचे तर संपूर्ण जगात अब्जो फॅन्स आहेत आणि तेच आता अंबानींनी हेरल आहे. त्यातही टीम लिव्हरपूल एफसी म्हण्टलं की विषय संपला. तरी मुकेश अंबानी हे टीम लिव्हरपूलचे नवे मालक होणार अशी चर्चा रंगली आहे.
इंग्लिश प्रीमियर लीग (english premier league) त्यांच्या सध्याच्या मालकांनी फेनवे स्पोर्ट्स ग्रुप (Funway Sports Group) द्वारे विक्रीसाठी ठेवले आहे. ज्यांनी ऑक्टोबर 2010 मध्ये मर्सीसाइड क्लब विकत घेतला. त्यांना आता संघ विकायचा आहे. संघ विकण्यात मदत करण्यासाठी गोल्डमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅनली यांची नियुक्ती केली आहे. FSG क्लब 4 अब्ज ब्रिटिश पौंडमध्ये विकण्यास तयार आहे. तरी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी या टीमबाबत चौकशी केली अशी माहिती मिळत आहे. (हे ही वाचा:- On This Day: रोहित शर्माने या दिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये केला होता मोठा विक्रम, श्रीलंकेविरुद्ध 173 चेंडूत केल्या 264 धावा )
FSG ने त्यापूर्वी योग्य अटी व शर्तींमध्ये म्हटले आहे, लिव्हरपूलच्या हिताचे आम्ही पुढे नक्कीचं विचार करू." गेल्या काही वर्षांमध्ये जर्गेन क्लॉपच्या संघाने प्रीमियर लीगचे विजेतेपद, चॅम्पियन्स लीग, एफए कप, काराबाओ कप आणि युरोपियन सुपर कप जिंकून एफएसजी अंतर्गत एन्फायड आउटफिटने प्रचंड यश मिळवले आहे. रिंगणातील इतरांमध्ये आखाती आणि यूएसएमधील पक्षांचा समावेश आहे. तरी अंबानींकडे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट संघ मुंबई इंडियन्सची मालकी आहे तसेच ते अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची व्यावसायिक भागीदार असुन इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धाही चालवते. त्यामुळे अंबानी फुलबॉल टीम लिव्हरपूल एफसीचे नवे मालक झाल्यास यात काही नाविन्य नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)