India Beat China: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय मुलींनी केला चमत्कार, चीनचा पराभव करुन रचला नवा इतिहास

भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत बहुतांश वेळा चेंडू आपल्या नियंत्रणात ठेवला तर दुसरीकडे चीनच्या खेळाडूंना सामन्यात एकही गोल करता आला नाही.

India women's national hockey team (Photo Credit - X)

Indian Women's Team Win in Asian Champions Trophy 2024: बिहारमधील राजगीर येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय महिला संघाने तिरंगा फडकावला आणि चीनचा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. भारताने अंतिम फेरीत चीनचा 1-0 असा पराभव केला. भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत बहुतांश वेळा चेंडू आपल्या नियंत्रणात ठेवला तर दुसरीकडे चीनच्या खेळाडूंना सामन्यात एकही गोल करता आला नाही. भारतासाठी सामन्यातील एकमेव गोल दीपिकाने केला आणि तिच्या गोलच्या जोरावर भारताला विजेतेपद मिळवण्यात यश आले. (हे देखील वाचा: Jake Paul Beat Mike Tyson: जेक पॉलचा माईक टायसनवर विजय; 8 फेरीच्या सामन्यात दाखवली दमदार कामगिरी, बक्षिसाची रक्कम ऐकून डोके चक्रावले)

भारताने दक्षिण कोरियाशी बरोबरी साधली

सलीमा टेटे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये वर्चस्व गाजवले आणि संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. भारताने उपांत्य फेरीत जपानचा पराभव केला होता. भारताने तिसऱ्यांदा (2016, 2023, 2024) आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. यासह भारताने दक्षिण कोरियाची बरोबरी केली आहे. दक्षिण कोरियाने ACT चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही तीन वेळा जिंकले.

महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद सर्वाधिक वेळा जिंकणारे हॉकी संघ:

भारतीय संघ- 3 वेळा

दक्षिण कोरिया - 3 वेळा

जपान - 2 वेळा

भारताने एकही सामना गमावला नाही

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये भारताने पाच सामने खेळले आणि ते सर्व जिंकले. म्हणजे एकही सामना न गमावता चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावण्यात संघाला यश आले आहे. चीनच्या संघाने पाच सामने खेळले, त्यापैकी फक्त एकच पराभव झाला आणि तोही अंतिम फेरीत. अंतिम फेरीत भारतासमोर चीनचे खेळाडू विशेष काही दाखवू शकले नाहीत.