Lockdown Extended: हॉकी इंडियाने सर्व राष्ट्रीय चॅम्पियनशिप अनिश्चित काळासाठी केले स्थगित
या स्पर्धा 29 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असून 3 जुलैपर्यंत खेळल्या जाणार होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कोविड-19 (COVID-19) विरुद्ध लढा देण्यासाठी लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केल्यावर हॉकी इंडियाने (Hockey India) मंगळवारी सर्व पुनर्निर्देशित राष्ट्रीय चॅम्पियनशिप (National Championships) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचं जाहीर केलं. या स्पर्धा 29 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असून 3 जुलैपर्यंत खेळल्या जाणार होत्या, पण आता ही चॅम्पियनशिप अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी सांगितले की, "हॉकी इंडियाने आपले सर्व खेळाडू, प्रशिक्षक, संघटक, चाहते आणि अधिकारी यांच्या हितसंबंध लक्षात घेऊन उर्वरित वार्षिक 2020 हॉकी इंडिया राष्ट्रीय स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे." ट्विटरवरून हॉकी इंडियाने याची माहिती दिली. “ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत आणि आम्ही कोविड-19 परिस्थितीच्या आधारावर नवीन तारखांची घोषणा करू,” असे ते म्हणाले. (IPL 2020 स्थगित होण्याच्या मार्गावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवल्याने टूर्नामेंटच भविष्य निश्चित)
अहमद म्हणाले की, हॉकी इंडिया संबंधित आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी यासाठी संबंधित केंद्र आणि राज्य सरकारच्या विभागांशी काम करत आहे.
2020 हॉकी इंडिया राष्ट्रीय स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेल्या खेळांमध्ये 10 वी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय स्पर्धा, रांची, झारखंड (बी आणि ए विभाग) यापूर्वी अनुक्रमे 29 एप्रिल ते 9 मे आणि 7मे ते 17 मे, दहावी हॉकी इंडिया ज्युनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चेन्नई, तामिळनाडू (बी आणि ए डिव्हिजन) यापूर्वी अनुक्रमे 14 मे ते 21 मे आणि 19 मे ते 30 मे, 10 वी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय स्पर्धा 2020, हिसार, हरियाणा (बी आणि ए विभाग) यापूर्वी अनुक्रमे 3 मे ते 14 मे आणि 12 मे ते 23 मे, दहावी हॉकी इंडिया सब ज्युनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप 2020, इम्फाल, मणिपूर (बी आणि ए डिव्हिजन) यापूर्वी 28 मे ते 4 जून आणि 3 जून ते 13 जून आणि दहावी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप, गुवाहाटी, आसाम (बी विभाग) यापूर्वी 20 जून ते 3 जुलै या कालावधीत या स्पर्धा खेळवला जाणार होत्या.