UEFA Euro 2020 Google Doodle: 12 जून पासून रंगणार्‍या युरो 2020 स्पर्धेचं औचित्य साधत गूगलचं खास डूडल

EURO 2020 Google Doodle| Photo Credits: Screen Shot From Google Homepage

गूगलने (Google) आज 2020 UEFA European Football Championship च्या उद्घाटनाचं औचित्य साधत एक दिवस आधी खास डूडल (Doodle) साकरालं आहे. रोमच्या Stadio Olimpico मध्ये Turkey विरूद्ध Italy अशा सामन्याने त्याची सुरूवात होणार आहे. युरो 2020 ही स्पर्धा 11 UEFA countries च्या 11 शहरांमध्ये खेळवण्याचा मागील वर्षीचा प्लॅन होता. 12 जून ते 12 जुलै 2020 ला होणार्‍या या सामन्याची आता वर्षभराने रंगत चढणार आहे. कोरोना महामारीमुळे आता बरोबर वर्षभराने आयोजित या स्पर्धेचं नाव मात्र UEFA Euro 2020 कायम ठेवण्यात आले आहे.

Italy vs Turkey हा यंदाच्या UEFA Euro 2020 स्पर्धेचा पहिला सामना असणार आहे. दरम्यान या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच या कोविड संकटात प्रेक्षक स्टेडियम मध्ये येणार आहेत. त्यामुळे अनेक युरोपियन फॅन्स साठी ही पर्वणी असणार आहे. UEFA Euro 2020: इथे जाणून घ्या युरोपमधील फुटबॉलच्या सर्वात मोठ्या टूर्नामेंट बद्दल सगळ्या मोठ्या गोष्टी.

UEFA Euro 1960 नंतर पहिल्यांदाच 11 विविध ठिकाणी युरोपात खेळवली जात आहे. UEFA Euro champions Portugal आणि FIFA World Cup winners France या टीम्स देखील 6 ग्रुप्समध्ये आणि प्रत्येकी 4 टीम मध्ये विभागल्या गेल्या आहेत.

11 होस्ट देशांमधील डेन्मार्क, इंग्लंड, जर्मनी, नेदरलॅन्ड, इटली, रशिया आणि स्पेन हे 7 देश आहेत. हंगेरी आणि स्कॉटलंड यांनी प्ले ऑफ द्वारा जागा मिळवली. रोमानिया आणि अझरबैंजान यंदा नसतील पण पण फिनलॅन्ड आणि North Macedonia यंदा पदार्पण करणार आहेत.

UEFA European Football Championship ही जगातली दुसरी मोठी इंटरनॅशनल फूटबॉल स्पर्धा आहे. त्यामुळे त्यावरही यंदा कोरोनाचं सावट आहे. आयोजकांनी त्याच्या दृष्टीने काही नियम अंमलात आणले आहेत. दरम्यान भारतामध्ये UEFA Euro 2020 चे लाईव्ह स्ट्रिमिंग SonyLIV वर पाहता येईल. तर SONY TEN 2,SONY TEN 3 वर टेलिकास्ट देखील दाखवले जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif