Forbes Highest-Paid Athletes 2021: MMA फायटर Conor McGregor सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू, पहा COVID-19 काळात तगडं मानधन मिळवणाऱ्यांची टॉप-10 लिस्ट

MMA फायटर आणि यूएफसी दिग्गज Conor McGregor आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक मानधन मिळविणारा अ‍ॅथलीट ठरला आहे. यूएफसी चॅम्पियनने फक्त नियमितपणे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंच्या पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले नाही तर कोरोनाने बाधित काळात क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांना पिछाडीवर टाकत फोर्ब्स सर्वाधिक मानधन कमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मानाचे स्थान पटकावले आहे.

कॉनोर मॅकग्रेगर (Photo Credit: Instagram)

आयरिश मिश्रित मार्शल आर्ट्स (Mixed Martial Arts) फायटर आणि अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियनशिप (Ultimate Fighting Championship) दिग्गज Conor McGregor आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक मानधन मिळविणारा अ‍ॅथलीट (Highest-Paid Athletes) ठरला आहे. पूर्वीच्या दोन प्रभागातील यूएफसी चॅम्पियनने फक्त नियमितपणे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंच्या पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले नाही तर कोरोनाने बाधित काळात जुव्हेंटस सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo), बार्सिलोनाचा कर्णधार आणि क्लब लीजेंड लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांना पिछाडीवर टाकत फोर्ब्स (Forbes) सर्वाधिक मानधन कमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मानाचे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, मॅक्ग्रेगोर 2020 मध्ये फक्त एकच फाईट खेळला जिथून त्याने तब्बल $22 लाखांची कमाई केली. फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील अव्वल 10 सर्वोच्च-पेड खेळाडूंच्या यादीनुसार, यंदा सुमारे 180 लाख डॉलर्सची कमाई करत मॅक्ग्रेगोरने अव्वल स्थान मिळवले आहे.

मॅक्ग्रेगोर याच्यापाठोपाठ पोर्तुगीज गोल मशीन रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा दिग्गज मेस्सी आहे. मेस्सीला दुसर्‍या क्रमांकावर स्थान मिळाले असले तरी त्याचा बॅलन डी ओअर प्रतिस्पर्धी रोनाल्डोने तिसरा क्रमांक मिळवला आहे. गेल्या वर्षी मेस्सीने 130 लाख डॉलर्सची कमाई केली आणि रोनाल्डो 120 लाख डॉलर्स घरी घेऊन गेला. बुधवारी रोनाल्डो जुव्हेंटससाठी100 गोल करणारा वेगवान खेळाडू बनला. डलास काउबॉयचे एनएफएल क्वार्टरबॅक डाक प्रेस्कॉट (107.5 लाख डॉलर्स) आणि चार वेळा एनबीए चॅम्पियन लेब्रोन जेम्स (96.5 लाख डॉलर्स) अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहे. फोर्ब्सने सांगितले की या कमाईमध्ये 1 मे 2020 आणि 1 मे 2021 दरम्यान मिळणारी बक्षीस रक्कम, पगार आणि बोनसचा समावेश आहे.

शिवाय, टॉप-10 खेळाडूंबद्दल बोलायचे तर पॅरिस सेंट-जर्मेन सुपरस्टार नेमार ($95 लाख) स्विस टेनिस दिग्गज रॉजर फेडरर ($90 लाख) यांनीही पहिल्या दहामध्ये प्रवेश केला. तसेच लुईस हॅमिल्टन ($82 लाख), एनएफएल टँपा बे बुकानेर क्वार्टरबॅक टॉम ब्रॅडी ($76 लाख), आणि ब्रूकलिन नेट्स स्टार केविन ड्युरंट ($75 लाख) देखील पहिल्या दहामध्ये सामील आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now