UEFA Euro 2020: इथे जाणून घ्या युरोपमधील फुटबॉलच्या सर्वात मोठ्या टूर्नामेंट बद्दल सगळ्या मोठ्या गोष्टी
महिनाभर चालणार्या या स्पर्धेत एकूण 24 संघ 51 सामने खेळतील. गतविजेते पोर्तुगाल 15 जूनपासून हंगेरी विरोधात सामन्याने मोहिमेची सुरुवात करतील. पोर्तुगाल ज्या गटात आहे त्याला 'ग्रुप ऑफ डेथ' म्हणतात.
UEFA Euro Cup 2020: कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आलेल्या यूईएफए युरो कप (Euro Cup_ 2020 शुक्रवारी सुरु होणार आहे. महिनाभर चालणार्या या स्पर्धेत एकूण 24 संघ 51 सामने खेळतील. 26 जूनपासून नॉकआऊट फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्येक संघ ग्रुप टप्प्यात तीन सामने खेळतील. 11 जुलै (12 जुलै IST) रोजी यूईएफए युरो (UEFA Euro) 2020 चा अंतिम सामना लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर खेळला जाईल. गतविजेते पोर्तुगाल (Portugal) 15 जूनपासून हंगेरी विरोधात सामन्याने मोहिमेची सुरुवात करतील. रोम येथे तुर्की (Turkey) आणि माजी विजेते इटली (Italy) संघातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होईल. क्वार्टर-फुल स्टॅडियो ओलिंपिको येथे नियोजित 16,000 चाहत्यांसमोर स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
2016 मध्ये स्पर्धेची मागील आवृत्ती जिंकलेला क्रिस्टियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) नेतृत्वातील पोर्तुगाल संघाचा हंगेरी (Hungary), मागील विजेते फ्रान्स (France) आणि जर्मनी (Germany) यांच्यासह गटात समावेश आहे. पोर्तुगाल ज्या गटात आहे त्याला 'ग्रुप ऑफ डेथ' म्हणतात. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच लंडन, सेंट पीटर्सबर्ग, बाकू, म्युनिक, रोम, अमस्टरडॅम, बुखारेस्ट, बुडापेस्ट, कोपेनहेगन, ग्लासगो आणि सेव्हिले अशा 11 यजमान शहरांसह संपूर्ण खंडात स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. मागील वर्षी 2020 मध्ये युरो चषक स्पर्धा होणार होती, परंतु कोरोना विषाणूमुळे स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलली गेली. 1960 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेची ही 16वी आवृत्ती आहे. शिवाय, विजयी संघाला 3300 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे.
असे आहे युरो कपचे ग्रुप
गट अ: तुर्की, इटली, वेल्स, स्वित्झर्लंड
गट ब: डेन्मार्क, फिनलँड, बेल्जियम, रशिया
गट सी: नेदरलँड्स, युक्रेन, ऑस्ट्रिया, उत्तर मॅसेडोनिया
गट डी: इंग्लंड, क्रोएशिया, स्कॉटलंड, झेक प्रजासत्ताक
गट ई: स्पेन, स्वीडन, पोलंड, स्लोव्हाकिया
गट एफ: हंगेरी, पोर्तुगाल, फ्रान्स, जर्मनी