Prakash Padukone यांना 70 व्या वाढदिवशी Deepika Padukone कडून खास गिफ्ट; पदुकोण बॅडमिंटन स्कूलचा करणार विस्तार
दीपिका पदुकोणने वडील प्रकाश पदुकोण यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. तिने पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन (PSB) चा विस्तार करण्यात येणार असलयाचे म्हटलं आहे.
Deepika Padukone: दीपिका पदुकोणने वडील प्रकाश पदुकोण यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करताना दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "बॅडमिंटन खेळून मोठी झालेली व्यक्ती म्हणून, हा खेळ एखाद्याच्या आयुष्याला किती आकार देऊ शकतो हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खेळ महत्त्वाचा आहे. पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन (PSB) द्वारे, आम्हाला आशा आहे की आम्ही सर्व स्तरातील लोकांपर्यंत बॅडमिंटनचा आनंद आणि त्यासाठीची शिस्त पोहोचवू शकतो. निरोगी आणि अधिक लक्ष केंद्रित करणारी आणि खेळाने प्रेरित असलेली पिढी निर्माण करू."
पुढे, ती पुढे म्हणाली, "बाबा, जे तुम्हाला चांगले ओळखतात, त्यांना या खेळाबद्दलची तुमची आवड माहित आहे. ७० व्या वर्षीही. तुमचे फक्त खाणे, झोपणे आणि श्वास घेणे फक्त बॅडमिंटनसाठी आहे. आणि आम्ही तुमची आवड प्रत्यक्षात आणण्यासाठी वचनबद्ध आहोत: बॅडमिंटन सर्वांसाठी! ७० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!
पदुकोण बॅडमिंटन स्कूल बेंगळुरू, एनसीआर, मुंबई, चेन्नई, जयपूर, पुणे, नाशिक, म्हैसूर, पानीपत, देहरादून, उदयपूर, कोइम्बतूर, सांगली आणि सुरतसह 18 भारतीय शहरांमध्ये प्रशिक्षण देतील.