Norway Chess 2025: जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला डी. गुकेशने केला पराभव; चिडलेल्या मॅग्नसने टेबलवर काढला राग (Video)

नॉर्वे बुद्धिबळ 2025 च्या स्पर्धा जोरदार चर्चेत आली आहेत. स्पर्धेच्या सहाव्या फेरीत जागतिक विजेता डी गुकेशने जागतिक क्रमांक 1 च्या मॅग्नस कार्लसनला अचंबित करत हरवल आहे.

D Gukesh (Photo: @FIDE_chess)

Norway Chess 2025: नॉर्वे बुद्धिबळ 2025 च्या रविवारी सुरू असलेल्या स्पर्धेच्या सहाव्या फेरीत जागतिक विजेता डी गुकेशने (Dommaraju Gukesh) रोजदार पुनरागमन केले. माजी जागतिक क्रमांक 1 च्या मॅग्नस कार्लसनला (Magnus Carlsen) हरवले. 19 वर्षीय डी गुकेश प्रज्ञानंदानंतर स्पर्धेच्या इतिहासात कार्लसनला हरवणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. त्यामुळे बुद्धिबळच्या खेळात भारताचे खेळाडू मोठे नाव करतील यात शंका नाही. गुकेशने नॉर्वे बुद्धिबळ 2025च्या (Norway Chess 2025) सहाव्या फेरीत ही कामगिरी केली.

कार्लसनची एक चूक गुकेशने साधला डाव

बुद्धिबळाच्या पटावरचा 34 वर्षीय कार्लसनवर गुकेशचा हा पहिलाच क्लासिकल विजय होता. अनेकवेळा स्पर्धक मोहरे चालवताना चूका करतात. कालच्या सामन्यातही अशीच चूक मॅग्नस कार्लसनने केली. त्याचा फायदा गुकेशने घेतला. त्यामुळे मॅग्नस कार्लसनचा पराभव झाला आणि गुकेशने विजायवर नाव कोरलं. त्यानंतर विजेत्याने गुकेशचा आनंद पाहण्याजोगा होता. गुकेशने त्याचे दीर्घकालीन प्रशिक्षक ग्रझेगोर्झ गाजेव्स्की यांच्यासोबत आनंद साजरा केला.

दुसरा भारतीय खेळाडू ठरला

नॉर्वे बुद्धिबळात भारतीय खेळाडूंनी कार्लसनला पारजीत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, प्रज्ञानंदने क्लासिकल चेसमध्ये कार्लसनचा पराभव केला होता. आता, गुकेशही त्या एलिट लीस्टमध्ये सामील झाला आहे. पराभवाने हादरलेल्या कार्लसनने टेवल सोडताना स्पष्टपणे निराशा व्यक्त केली. त्याने टेबलावर हात आपटून मैदानाबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या फेरीतील सामन्यात कार्लसनने गुकेशला हरवल्यानंतर काही दिवसांतच हा पराभव झाला. ज्यामुळे सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement