Coronavirus: जुवेंटससाठी मोठा धक्का, अर्जेंटिना स्टार फुटबॉलपटू पाउलो देबाला याची चौथी कोरोना व्हायरस टेस्ट पॉसिटीव्ह-रिपोर्ट
जुवेंटससाठी ही गोष्ट एक मोठा धक्का ठरू शकते. सेरी ए ने यापूर्वी खेळाडूंना 4 मेपासून वैयक्तिक प्रशिक्षणात भाग घेण्याची परवानगी दिली होती.
अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू पाउलो देबाला (Paulo Dybala) याची गेल्या सहा आठवड्यांत चौथ्यांदा कोरोना व्हायरस (Coronavirus) टेस्ट पॉसिटीव्ह आल्याची मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जुवेंटससाठी (Juventus) ही गोष्ट एक मोठा धक्का ठरू शकते. सेरी ए ने (Serie A) यापूर्वी खेळाडूंना 4 मेपासून वैयक्तिक प्रशिक्षणात भाग घेण्याची परवानगी दिली होती. "स्पॅनिश प्रोग्राम 'एल चेरिंगिटो' सांगितले की देबालाची मागील सहा आठवड्यांत चार टेट्स करण्यात आल्या असून त्यातील ताजी टेट्स पुन्हा सकारात्मक आली आहे," द सनने आपल्या अहवालात म्हटले आहे. देबाला याला जुवेंटसचा सह खेळाडू डेनिली रूगानी (Daniele Rugani) याच्यासमवेत जीवघेण्या व्हायरसची लागण होणार पहिला फुटबॉलपटू होता. देबालाने मार्चमध्ये इंस्टाग्रामद्वारे त्याला आणि गर्लफ्रेंडची कोरोना टेस्ट सकारात्मक आल्याचे जाहीर केले होते. (Lockdown: लॉकडाउन दरम्यान रिद्धिमान साहा याच्या घरी चोरीचा प्रयत्न, गाडीतून आलेले सहाही चोर गाडीतून फरार)
कोरोना व्हायरसमुळे इटली जगातील सर्वात जास्त नुकसान झालेल्या देशांपैकी एक आहे. देशात आजवर 200,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे तर 27,000 पेक्षा जास्त व्यक्तींनी आत्तापर्यंत आपला जीव गमावला आहे. इटालियन क्रीडामंत्री विन्सेन्ज़ो स्पडाफोरा यांनी यापूर्वी फुटबॉलचा हंगाम संपविणे सोपे होईल आणि जर लीग्स सुरू झाल्या तर ही एक हळूहळू प्रक्रिया झाली पाहिजे असेसुचवले होते. “हंगाम त्वरित संपविणे खूप सोपे होईल आणि वैज्ञानिक समुदाय सहमत होईल,” असे त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिले.
याव्यतिरिक्त, इटली सेरी ए क्लब एसी मिलान आणि इटालियन फुटबॉलपटू पोओलो माल्डिनी आणि त्यांचा मुलगा डेनियल यांनाही कोरोना व्हायरस साथीच्या आजाराची लागण झाल्याचे आढळले होते. इटालियन क्लब एसी मिलान यांनी एका निवेदनात ही माहिती दिली होती. दुसरीकडे, इटलीमध्ये व्हायरसच्या संसर्गामुळे तब्बल 27 हजार लोकांनी जीव गमावला तर 201505 जणांना या जीव घ्या व्हायरसची लागण झाली आहे.