All England Open Championships 2020: पीव्ही सिंधू क्वार्टर फायनलमध्ये, लक्ष्य सेन आऊट
सहाव्या मानांकित आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधूने 49 मिनिटांच्या सामन्यात 21-19 21-15 असा विजय मिळवला. दुसरीकडे, पुरुष ऐकेरीत युवा लक्ष सेन पराभूत होऊन स्पर्धे बाहेर पडला आहे.
रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती भारतीय महिला स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप (All England Championships) एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सहाव्या मानांकित आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधूने 49 मिनिटांच्या सामन्यात 21-19 21-15 असा विजय मिळवला. दुसरीकडे, पुरुष ऐकेरीत युवा लक्ष सेन (Lakshya Sen) पराभूत होऊन स्पर्धे बाहेर पडला आहे. सिंधूने सुंग जी ह्युनला (Sung Ji-hyun) सरळ गेममध्ये पराभूत करून अंतिम 8 मध्ये स्थान मिळवले. सिंधूचा सामना आता चौथा मानांकित जपानची नंबर 1 नोजोमी ओकुहारा आणि डेन्मार्कच्या लिने होजमार्क जार्सफेल्ट यांच्यातील विजेत्याशी होईल. दिवसाच्या सुरुवातीला पुरुषांच्या एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये विक्टर ऐक्सल्सन (Viktor Axelsen) विरुद्ध लक्ष्य सेनला सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. 45 मिनिटं चाललेल्या पुरुष एकेरीच्या दुसर्या फेरीत सेनला दुसरे मानांकित आणि जगातील सातव्या क्रमांकाचा डेन्मार्कच्या व्हिक्टरकडून 17-21 18-21 असा पराभव पत्करावा लागला. (All England Championships 2020: सायना नेहवाल, श्रीकांत किदाम्बी पहिल्या फेरीत गारद)
नंतर अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांच्या जोडीला महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. पोनप्पा आणि सिक्की रेड्डी यांचा मिसाकी मत्सुतोमो-अयाका तकाहाशीच्या जोडीने 13-21, 14-21 असा पराभव केला. यासह सिंधूच्या रूपात या स्पर्धेत भारताचे हे एकमेव आव्हान राहिले आहे.
यापूर्वी, भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालची ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवण्याच्या आशेला धक्का बसला जेव्हा तिला जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. सायन सध्या जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानी आणि आणि ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवण्यासाठी तिला 16 वी क्रमवारी मिळवणे आवश्यक आहे. बुधवारी सायनाला जागतिक क्रमवारीत तिसर्या क्रमांकाच्या यमागुचीने 11-21, 8-21 ने अवघ्या 28 मिनिटांत पराभूत केले.