Grigor Dimitrov, Borna Coric Test Corona Positive: टेनिसपटू ग्रिगोर दिमित्रोव-बोर्ना कोरीक कोविड-19 संक्रमित, Adria Exhibition Tour रद्द

बल्गेरियन टेनिस स्टार ग्रिगोर दिमित्रोव आणि क्रोएशियाचा बोर्ना कोरीक यांची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली आहे. अधिकृत ट्विटर हँडलवर कोरीकने याची पुष्टी केली. जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानावर आणि तीन वेळा ग्रँड स्लॅम सेमीफायनलिस्ट दिमित्रोवने रविवारी त्याची कोरोना चाचणी सकारात्मक असल्याचे घोषित केले होते.

बोर्ना कोरिक-ग्रिगोर दिमित्रोव (Photo Credit: Getty)

जगभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर कायम आहे. जगभरात कोरोना संक्रमितांच्या संख्या 90 लाखांच्या वर पोहचली आहे. त्यापैकी 48 लाखाहून अधिक बरे झाले आहेत, तर 4 लाखाहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. शाहिद आफ्रिदी आणि मश्रफे मुर्तजा यांना कोरोनाची लागण झाल्याने क्रिकेट विश्वातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यानंतर आता दोन टेनिसपटूही कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. बल्गेरियन टेनिस स्टार ग्रिगोर दिमित्रोव (Grigor Dimitrov) आणि क्रोएशियाचा बोर्ना कोरीक (Borna Coric) यांची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली आहे. अधिकृत ट्विटर हँडलवर कोरीकने याची पुष्टी केली. जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानावर आणि तीन वेळा ग्रँड स्लॅम सेमीफायनलिस्ट दिमित्रोवने रविवारी त्याची कोरोना चाचणी सकारात्मक असल्याचे घोषित केले होते. दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यावर क्रोएशियामध्ये सुरू असलेली प्रदर्शन स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू नोवाक जोकोविच सुद्धा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार होता. (US Open 2020: 'ठरल्यानुसार होणार यूएस ओपनचे आयोजन',  न्यूयॉर्क गव्हर्नर Andrew Cuomo यांनी केली केली पुष्टी)

दुसरीकडे, कोरीक म्हणाला, “माझी कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करवून घ्यावी. मी निरोगी आहे आणि मला कोणत्याही प्रकारचे लक्षणे दिसत नाहीत." यापूर्वी दिमित्रोवने इंस्टाग्रामवर कोविड-19 संक्रमित असल्याचे जाहीर केले होते. यानंतर कोरीकसह सुमारे 1000 लोकांची चाचणी घेण्यात आली.

कोरीकचे ट्विट

दिमित्रोवची पोस्ट

 

View this post on Instagram

 

Hi Everyone-I want to reach out and let my fans and friends know that I tested positive back in Monaco for Covid-19. I want to make sure anyone who has been in contact with me during these past days gets tested and takes the necessary precautions. I am so sorry for any harm I might have caused. I am back home now and recovering. Thanks for your support and please stay safe and healthy. GD

A post shared by Grigor Dimitrov (@grigordimitrov) on

प्रदर्शन स्पर्धेच्या दुसर्‍या टप्प्यात कोरीक शनिवारी जादरमध्ये दिमित्रोवविरुद्ध खेळला. या सामन्यानंतर दिमित्रोव्हने थकवा असल्याची तक्रार केली. बल्गेरियन खेळाडूने सांगितले की त्याला मोनाको येथे घेण्यात आलेल्या चाचणीत संसर्ग झाल्याचे आढळले. व्यावसायिक टेनिस टूर्स मार्चपासून स्थगित करण्यात आले असून ऑगस्टमध्ये ते पूर्ववत करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, माजी टेनिसपटू आणि जोकोविचचे प्रशिक्षक गोरान इव्हानिसेविच म्हणाले की दिमित्रोवची बातमी धक्कादायक होती आणि आता सर्वांनाच टेस्ट करून घ्याव्या लागतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement