2026 Winter Olympics Google Doodle: ऑलिंपिक हिवाळी खेळ, अमेरिकेचा सुवर्ण विजय; गुगल डूडलने साजरा केला फिगर स्केटिंगमधील ऐतिहासिक विजय

इटली येथे सुरू असलेल्या 2026 च्या हिवाळी ऑलिंपिकमध्ये फिगर स्केटिंग सांघिक स्पर्धेत अमेरिकेने मिळवलेल्या रोमहर्षक विजयाचे गुगल डूडलने खास चित्रण केले आहे. इलिया मलिंनच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने जपानवर मात करत सुवर्णपदक पटकावले.

मुंबई : इटलीमध्ये सुरू असलेल्या 'मिलान कॉर्टिना २०२६' हिवाळी ऑलिंपिकमध्ये अमेरिकेच्या फिगर स्केटिंग संघाने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी शोध इंजिन असलेल्या 'गुगल'ने सोमवारी एक विशेष डूडल प्रदर्शित केले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत अमेरिकेने जपानचा अवघ्या एका गुणाने पराभव करत सलग दुसऱ्यांदा या क्रीडा प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले.

इलिया मलिंनचा 'सुवर्ण' खेळ अमेरिकेच्या या विजयाचा शिल्पकार २१ वर्षीय खेळाडू इलिया मलिंन ठरला. 'क्वाड गॉड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलिंनने पुरुष फ्री स्केट प्रकारात पाच 'क्वाड्रपल जंप्स' मारत २००.०३ गुणांची कमाई केली. स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात जपान आणि अमेरिका यांच्यात गुणांची बरोबरी झाली होती. मात्र, मलिंनने दबावाखाली सर्वोत्तम कामगिरी करत जपानच्या शुन सातोला मागे टाकले आणि अमेरिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

अटीतटीची लढत आणि पदकतालीत स्थान तीन दिवस चाललेल्या या सांघिक स्पर्धेत अमेरिकेने एकूण ६९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. जपानला ६८ गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, तर यजमान इटलीने ६० गुणांसह कांस्य पदक जिंकले. इटलीने फिगर स्केटिंगच्या सांघिक प्रकारात पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. या विजयानंतर अमेरिकेच्या पदकतालिकेत आता दोन सुवर्णपदके झाली असून, नॉर्वे तीन सुवर्णपदकांसह सध्या आघाडीवर आहे.

विजेत्या संघातील प्रमुख खेळाडू अमेरिकेच्या या विजेत्या संघात अनुभवी मॅडिसन चॉक आणि इव्हान बेट्स या जोडीसह एली काम, डॅनी ओ'शिया आणि अलिसा लिऊ यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, डॅनी ओ'शिया हे ३५ व्या वर्षी ऑलिंपिक पदार्पण करणारे सर्वात वयस्कर अमेरिकन फिगर स्केटर ठरले आहेत. त्यांच्या या अनुभवाचा आणि तरुण खेळाडूंच्या ऊर्जेचा फायदा संघाला सुवर्णपदक मिळवण्यासाठी झाला.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement